१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे - Page 126

ट्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आहे. अस्पृश्य वर्गाची सर्वांगीण उन्नती करून त्यांना राजकीय हक्क

मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी केलेला आजपर्यंतचा स्वार्थत्याग जनतेच्या

डोळ्यांसमोर आहे. हिंदुस्थानातील जी. आय. पी. रेल्वेवर अस्पृश्य वर्गीय

कामंगार ' पुष्कळ आहेत. यांची योग्य संघटना केल्यावर भांडवलदार॑ व

कारखानदार वर्गाविरूद्ध होत असलेल्या लढ्यासंबंधी योग्य चर्चा होऊन या

परिषदेच्या अधिवेशनाने अखिल रेल्वे कामगारांच्या बऱ्याच हिताच्या गोष्टी

घडल्याशिवाय रहाणार नाहीत. कामगारांचे जीवन किती कष्टमय असते याची

कल्पना नुसत्या पुस्तकी विद्येने होणार नाही. त्या प्रत्यक्ष बिकट अशा

जीवनकलहात समरस झाल्याशिवाय त्यांच्या असह्य परिस्थितीची कल्पना येणे

कठीण आहे. रेल्वेसारख्या श्रीमान आणि बलाढ्य अशा व्यापारी संस्थेने

आपल्या कामगारांविषयी योग्य काळजी घेणे किती आवश्यक आहे ही गोष्ट

दुसऱ्याने सांगून उपयोगी नाही. त्याची जाणीव या धनिक लोकांना प्रथम होणे

जरूरीचे आहे. ज्यांच्या श्रमावर आपण श्रीमंत होऊन ऐषारामामध्ये लोळत आहोत त्या कामगारांना निदान दोनवेळ पोटभर अन्न मिळण्याइतके वेतन देणे प्रत्येक कारखानदाराचे, धनिकाचे आणि भांडवलवाल्याचे पहिले असे कर्तव्यकर्म आहे. कामगारांचा लढा म्हणजे पोटाच्या प्रश्‍नाचा आहे. आपणास आणि आपल्या मुलांबाळांस दोनवेळ कशी मिठभाकर मिळेल याची विवंचना या कामगार बांध्रवांना लागलेली असते. अशा वेळी थोडीशी विश्रांती आणि ऐषाराम करण्याकडे त्यांची प्रवृत्ती होण्याइतकी मन:स्थिती स्थीर नसते. या सर्व परिस्थितीचा विचार करुन ही परिषद भरविण्याचे ठरले आहे

ही परिषद यशस्वी करण्याकरिता मनमाड, भुसावळ, कल्याण इगतपुरी नांदगाव, .दौंड, सोलापूर. ठाणे व मुंबई वगैरे ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्या मंडळींनी डॉ. बाबासाहेबांबरोबर आगाऊ विचार विनिमय केलेला आहे. परिषदेची ही. कल्पना प्रसिद्ध होताच मुंबई पासून दिल्ली, .अलाहाबाद,.लखनौ कानपूर जबलपूर, रायपूर वगैरे ब्रँच लाईन विभागातून ही परिषद यशस्वी करण्याबद्दल प्रत्यक्ष सहानुभूतीचा पाठिबा मिळत आहे. अशा तऱ्हेने ही प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधींची प्राथमिक स्वरूपाची खरी कॉन्फरन्स यशस्वी करण्याकरिता सर्व अस्पृश्य रेल्वे कामगारांनी परिषदेच्या चालक मंडळीला आपुलकीच्या प्रेमाने कार्याच्या कळकळीने मदत करणे आवश्यक आहे. या परिषदेचे जनरल सेक्रेटरी श्री. आर. आर. पवार हे आहेत. यांच्या कार्याविषयी अस्पृश्य रेल्वे कामगारांना पूर्ण जाणीव आहे. तसेच परिषदेची इतर चालक मंडळीविषयी आमच्या अस्पृश्य रेल्वे कामगारांना माहिती आहे. शिवाय ही परिषद आपले