स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . ... . संघटनांचे ध्येय असावे ८९
परमपूज्य पुढारी व स्वतंत्र मजूर पक्षाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास' अध्यक्षतेखाली भरणार आहे. परिषदेची विनंती पत्रके व वर्गणीसाठी पावंत्या पुस्तके ठिकठिकाणच्या परिषदेच्या ' कार्यकर्त्याकडे पाठविल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक अस्पृश्य रेल्वे कामगाराने परिषदेचे प्रतिनिधी झालेच पाहिजे. ' "आपली संघटना स्वावलंबनाच्यां मार्गाने केल्याशिवाय आपल्या कार्यास खरे यश प्राप्त होणार नाही. ' हा डॉ. बाबासाहेबांचा बांचा संदेश प्रत्येक अस्पृश्य रेल्वे कामगारानी आपल्या अंतःकरणात जागृत ठेवावा. मनमाड येथे अखिल जीं. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद यशस्वी करण्यात आपल्या कामगार चळवळीच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे ही गोष्ट प्रत्येकाने पूर्णपणे लक्षात ठेवून ही परिषद तनमनधनाने विजयी करण्याचा आजच निर्धार करावा
वरील परिषद याच वर्षी मु. मनमाड येथे भरविण्याचे नक्की . ठरले होते. परंतु परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्वी ठरलेल्या तारखांना इतर कामामुळे हजर राहाणे अशक्य झाले होते. आता ही परिषद मु. मनमाड येथे ता. २९ व ३० जानेवारी १९३८ रोजी नक्की भरणार आहे. .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या तारखांना. परिषद भरविण्यास परिषदेच्या चालकांना कळविताच ते परिषदेच्या तयारीस मोठया जोमाने लागले आहेत. रेल्वे किंवा गिरण्या अथवा मोठमोठ्या कारखान्यांत अस्पृश्य मानलेल्या कामगारांना किती त्रास होतो, त्यांना या अंगमेहनतीच्या कामात सुद्धा केवळ अस्पृश्यतेमुळे किती मानहानी सोसावी लागते, तसेच. आर्थिकदृष्ट्याही अस्पृश्य कामगारांना अतोनात नुकसान सोसावे लागते. ही प्रत्यक्ष परिस्थिती एकदा जगाच्या निदर्शनास आणून आजच्या सुधारणेच्या काळातही अस्पृश्यतेचा कलंक अस्पृश्य कामगारांना कसा नड़तो याची सहज खात्री ,पटविता येईल. अस्पृश्य कामगारांवर होणाऱ्या या अन्यायाचे निर्मूलन होण्याकरिता ही
रेल्वे कामगारांची निराळी व स्वतंत्र अशी परिषद भरविणे परिस्थितीने भाग पाडले
आहे. अस्पृश्य कामगारांना इतर कामगारांपासून कधीही: विभक्त. व्हावयाचे
नाही. सर्व कामगारांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्यात अस्पृश्य कामगार
त्यांच्याशी सहकार्य करीलच. परंतु आज अस्पृश्य कामगाराला अस्पृश्यतेमुळे
जी बिकट परिस्थिती प्राप्त झाली आहे, त्याचा विचारविनिमय करण्याकरिता व इतर कामगारांच्या हितसंबंधाच्या प्रश्नांसंबंधी नक्की धोरण ठरविण्याकरिता ही
जी. आय. पी. रेल्वे कामगार परिषद भरविण्यात येत आहे
१ जनता : ८ मे १९३७.