आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ९०
खुलासा केलेला आहे. तरी अस्पृश्य या परिषदेचा वरीलप्रमाणे थोडक्यात
परिषद यशस्वी करण्याचा रेल्वे कामगारांनी आपली संघटना करून ही मनमाडची
सेक्रेटरी प्रयत्न करावा. या परिषदेचे तरूण व उत्साही जनरल
श्री. आर. आर. पवार यांनी परिषद अपूर्व व यशस्वी करण्याचा संकल्प केला असून ते आपल्या सहकारी व कार्यकारी मित्र मंडळीच्या मदतीने हे कार्य करावयास
लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षपदावरून रेल्वे कामगारांना मार्गदर्शक होईल अशा धोरणाचे भाषण करणार आहेत. ही परिषद अखिल
भारतीय स्वरूपाची आहे. तिचे यश म्हणजे भारतीय रेल्वे अस्पृश्य कामगारांचे खरे हित होय. म्हणून सर्व कामगारांनी आपल्या प्रचंड शक्तीने ही परिषद :
जोमाने आणि अपूर्व विजयाने पार पाडण्यासाठी परिषदेच्या चालकमंडळीशी प्रत्यक्ष सहकार्याने मदत करावी. अस्पृश्य कामगार प्रसंग पडल्यास आपली |
चळवळ स्वावलंबनाच्या मार्गाने कशी यशस्वी करू शकतात हेही जगाला
कळेल. आमचे जागृत झालेले रेल्वे अस्पृश्य कामगार आपल्या कर्तव्यकर्मास |
जागून या परिषदेची अलौकिक शक्ती सर्वांना दाखविल्याशिवाय राहाणार नाहीत
अशी आम्हास खात्री वाटते. '* १ |
सदरहू परिषदेला हजर राहाण्याविषयीचे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनरल सेक्रेटरी यांना पाठविले. त्याप्रमाणे जनरल सेक्रेटरी यांनी बाबासाहेबांना पत्र पाठविले आणि जाहीर खुलासा प्रसिद्ध केला. सदरहू दोन्ही पत्र व खुलासा
येणे प्रमाणे- | |
“राजगृह, हिंदू कॉलनी
दादर- मुंबई ता. १४-१-१९३८.
श्रीयुत रामचंद्रराव पवार, जनरल सेक्रेटरी, रेल्वे दलित 'कामगार मंडळ व कामगार लोक यासी :-
मनमाड येथे भरणारी रेल्वे दलित कामगार परिषद ही सर्व दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी परिषद होणार आहे. या परिषदेस ता. २९ व ३० जानेवारी १९३८ रोजी मी हजर राहीन असे कबूल केले होते. परंतु अपरिहार्य कारणामुळे वरील तारखांना मला हजर राहाता येत नाही याबद्दल वाईट वाटते. सदरची तारीख फक्त १५ दिवसांनी पुढे वाढविल्यास सदर वेळी परिषदेस हजर राहण्यास मला भरपूर अवधी मिळेल. साठी सदर परिषद ता. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ शनिवार व रविवार रोजी घेतल्यास ठीक होईल व तसेच अनेक दिवसांपासून % जनता: 0 00 २५ डिसेंबर 0 बर 00 १९३७. 0 ˆ 76 पय तितच्या