स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . . संघटनांचे ध्येय असावे ९१
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील. सटाणे व काझीसांगवी या गावांना मी भेट देण्याविषयी तिकडील लोकांची असलेली इच्छाही तृप्त करता येईल. साठी सदर परिषद वरील तारखेस घेण्याची कृपा करावी. आपल्यापैकी अनेकांना ता. २९ व ३० जानेवारी १९३८ रोजीची रजा व पास'मिळविण्याबाबत बराच त्रास झांला असेल हे मला कबूल आहे. त्याबद्दल आपण मला माफ करावे.अशी विनंती आहे. क. लो. अ. ही वि |
आपला. कृपाभिलाषी,
- भिमराव रा. आंबेडकर.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणी शीर सा. दंडवत वि. वि
आपले आज्ञेप्रमाणे रेल्वे दलित कामगार परिषद ता. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ शनिवार व रविवार रोजी स्वागत मंडळाच्या विचारे ठेविली आहे. चरणी श्रुत होय. .
आपला नम्र सेवक,
` आर. आर. पवार.
जाहीर खुलासा.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज्ञेनुसार रेल्वे दलित कामगार परिषद ता. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ शनिवार व रविवार रोजी घेण्याचे निश्चित ` ठरले असून लवकरच कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येईल. _
आपला नम्र सेवक, .
आर. आर. पवार,
जनरल सेक्रेटरी,
मनमाड रेल्वे दलित कामगार परिषद.” १
१ जनता : २२ जानेवारी १९३८.