९२ .. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन -आणि भाषणे
मनमाड येथील त्रिवेणी संगम
'* शनिवार व रविवार ता. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी मु. मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणाऱ्या अखिल जी. आय. पी -रेल्वे अस्पृश्य कामगार परिषदेसाठी एक भव्य मंडप मनमाड स्टेशनजवळच मि. इब्राहिम ताजभाई शेठ यांच्या जागेत उभारून त्याला दलित कामगार नगर असे नाव देण्यात आले आहे. आजपर्यंत रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या अस्पृश्य कामगारांवर जो अन्याय होत आहे, त्यांची चहूबाजूंनी जी एकप्रकारची कुचंबणा होत आहे. या सर्व हृदयद्रावक गोष्टींचा विचारविनिमय या परिषदेमध्ये प्रामुख्याने होईल. ' कामगार म्हटला की, त्याला जात नाही, धर्म नाही ' वगैरे उच्च तत्त्वे मान्य करूनही अस्पृश्य कामगारावर केवळ अस्पृश्यतेमुळे कसा अन्याय होतो हे या परिषदेच्या अधिवेशनामध्ये नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगणार आहेत आणि कामगारांच्या खऱ्या लढाऊ लढ्याची दिशा कोणती याचेही योग्य रीतीने विवेचन करणार आहेत. तरी अशा महत्त्वाच्या परिषदेच्या अधिवेशनाला प्रत्येक अस्पृश्य मानलेल्या रेल्वे कामगाराने प्रतिनिधी होऊन अवश्य हजर रहावे
परिषदेचा कार्यक्रम
शनिवार ता. १२ फेब्रुवारी १९३८ रोजी सकाळी ८ ते ११ विषयक नियामक कमिटीची बैठक, दुपारी ३ वाजता स्वागताध्यक्ष श्री. पी. एन. बनकर यांचे भाषण, अध्यक्षांची सूचना, स्वागतपर पदे व पोवाडे, संदेश वाचन, रात्रौ भोजनानंतर जलसे. | | |
रविवार ता. १३ फेब्रुवारी १९३८ रोजी सकाळी ९ वाजता अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण व इतर कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनमाड येथे शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी मुक्काम आहे. शनिवारी रेल्वे परिषदेच्या कामकाजापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व काही निमंत्रित मंडळीकरिता मु. सटाणे व काझीसांगवी येथे जाहीर पानसुपारी निमित्त छोटे कार्यक्रम उरकून घेण्यात येतील.
मुंबई इलाखा अस्पृश्य युवक परिषद
शनिवार ता. १२ रोजी रात्रौ ८ वाजता वरील युवक परिषदेचे अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे. या युवक परिषदेमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचा कार्यक्रम सर्व इलाख्यामध्ये जोमाने अंमलात