१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे - Page 131

स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वांवर ... . ..संघटनांचे ध्येय असावे ९३.

आणण्याविषयी विचारविनिमय होऊन पुढील कार्यक्रमाची. दिशा आखली जाईल. . आपल्या पक्षाचा कार्यक्रम युवकांच्याच मदतीने यशस्वी होणार असल्यामुळे या युवक परिषदेचे ' महत्त्व जाणून सर्व तरूणांनी या परिषदेस अगत्यपूर्वकः हजर रहावे FN CECI SNR

महाराष्ट्रीय अस्पृश्य महिला परिषद.

तरूणांच्या परिषदेप्रमाणेच 'ही अस्पृश्य महिलांची परिषद ' देलित कामगार नगरात ' रविवार ता. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता पुण्याच्या प्रमुख कार्यकर्त्या सौ. मैनाबाई शामराव भोळे यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे. या परिषदेच्या स्वागतांध्यक्षाच्या जागी सौ. वेणूबाई रविकांत जाधव यांची निवड केलीं आहे. या महिला परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांना आपल्या चळवळीच्या कामगिरी संबंधी संदेशात्मक भाषण होईल. यांशिवाय इतर भाषणे,

ठराव वगैरे कार्यक्रम होईल [ |

या दोन दिवसात मनमाड येथे हे होणारे प्रचंड कार्यक्रमाचे कार्य निर्विघ्नपणे विंघ्नपणे यशस्वी करण्याची सारी व्यवस्था रेल्वे परिषदेच्या कार्यकारी मंडळाकडून ठेवण्यात

येईल. |

करमणुकीचे कार्यक्रम

या दोन्ही दिवशी प्रमुख पाहुणे मंडळी, प्रतिनिधी व प्रेक्षक मंडळींची करमणूक करण्याकरिता निरनिराळे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. या प्रसंगी नाशिक जिल्हा युवक संघाचा जलसा, मनमाड येथील जुनी रूढीविध्वंसक जलसा मंडळ नाशिकरोड येथील सत्यवादी सामाजिक जलसा, याशिवाय चांदवड जोपूळ. इत्यादिकांचे जलसे ; शाहींर घेगडे यांचे पोवाडे, गायन, कातरगावकर व वडाळा येथील श्री. एस. आर. साळवे यांच्या मुलामुलींचा संगीत मेळा असे विविध

कार्यक्रम होतील

अशारितीने मनमाड येथे होणाऱ्या परिषदांचे कार्यक्रम वर नमूद केले आहेत. यामुळे या महत्त्वाच्या तीन परिषदांचा त्रिवेणी संगमाचा आलेला अपूर्व योगायोग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या स्वावलंबनाच्या व स्वातंत्र्याच्या चंळवळीलां विशेष पोषक होईल यांत मुळीच शंका नाही. ही सोरी जबाबदारीची कार्ये पार पाडण्याच्या कामी मे. आरं. आर. पवार, बनकर, अहिरे. खरे. संसारे, पाटील, सरोदे, मोरे, पगारे व तेलुरे वगैरे मंडळी झटत आहेत हे त्यांना खरोखरच भूषणावह आहे