डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ९४
मुंबई इलाख्यातीलच `या तिन्ही महत्त्वाच्या परिषदा यशस्वी करण्याच्या बाबतीत
नाही, तर प्रांतातील अस्पृश्य बंधुभगिनींनी सहाय्य करून भागणार इतर मंडळीनीही सहकार्य करावे. या तिन्ही परिषदांसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिकरोड, इगतपुरी, धानोरी, नागपूर वऱ्हाड प्रांतातून प्रतिनिधी
हजर राहाणार आहेत.
नागपूरच्या पाहुणेमंडळीशी विचारविनिमय
रविवार ता. १३.फेब्रुवारी १९३८ रोजी दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान नागपूर वऱ्हाड प्रांतातून आलेल्या प्रतिनिधींबरोबर येथील चळवळी संबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारविनिमय करणार आहेत. परिषदेमधील करमणुकीच्या कार्यक्रमात वेळेनुसार फरक करण्यात येईल. या परिषदांसाठी चाळीसगाव येथून बँड येणार असून परिषदांच्या जाहीर कामकाजासाठी मंडपात लाऊड स्पीकरची योजना
दोन्ही दिवसांकरिता केली आहे.
जनता पत्र व स्वतंत्र मजूर पक्ष यांच्यासाठी दोन स्वतंत्र ऑफिसे ठेवण्यात आंली आहेत. जनता पत्राचे वर्गणीदार होणारांनी आपली वार्षिक वर्गणी येथे भरावी. तसेच स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होणारांनी या ऑफिसात आपली वर्गणी भरावी, याशिवाय या दोन्ही ऑफिसात आपल्या चळवळी संबंधी माहिती
देण्याची व्यवस्था केली आहे. “ *
* इतके दिवस गाजत असलेले अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य. कामगारांच्या परिषदेचे अधिवेशन गेल्या शनिवार व रविवार ता. १२, १३ फेब्रुवारी
१९३८ रोजी यशस्वीरीतीने पार पडले. या परिषदेसाठी ' दलित-क्रामगार नगराची ' केलेली सजावट उत्कृष्ट होती. निदान २० हजार लोकसमुदाय बसेल अशी व्यवस्था परिषदेच्या चालकांनी केली होती. तसेच परिषदेतील भाषणे सर्वाना ऐकायला मिळावीत म्हणून खास ' लाऊड स्पीकर ' ची योजना केली होती. अध्यक्ष व कर्मचारी मंडळासाठी एक छोटेसे व्यासपीठ तयार केले होते. त्यावर कित्येक प्रमुख कार्यकर्त्यांचे फोटो व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य फोटो पुष्पहाराने मंडित केलेला होता. व्यासपीठाच्या उजव्या बाजूस स्त्रियांकरिता खासं निराळी व्यवस्था केली हाती आणि व्यासपीठाच्या आजुबाजूला स्वागत मंडळाचे प्रतिनिधी व निमंत्रित पाहुणे मंडळींची रःवस्था ठेवण्यात आली
१ जनता : ५ फेब्रुवारी १९३८.