स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . . संघटनांचे ध्येय असावे ९५
शनिवारी सायंकाळी परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे
आपल्या मित्रमंडळींसह ' दलित कामगार नगरात ' प्रवेश करताच त्यांचे बँडच्या
सुस्वर वादनाने व त्यांच्या नावाच्या गगनभेदी जयजयकाराने मोठ्या उत्साहाने,
प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत करण्यात आले. ते व्यासपीठावर चढून
बसेपर्यंत ' डॉ. आंबेडकरांचा जयजयकार असो ', ' डॉ. आंबेडकर झिंदाबाद ',
“ कामगारांचा विजय असो ' वगैरे प्रकारच्या जयजयकाराने ते सारे वातावरण
कित्येक मिनिटे दुमदुमून गेले होते. यानंतर स्वागत पदे व अभिनंदनाची गाणी
लहान मुलामुलींच्या मेळयाने सुस्वर आवाजात गाऊन दाखविली: याबाबतीत
श्री. शंकरराव साळवे यांनी बरीच: मेहनत घेतली होती. परिषदेच्या
कामकाजास सुरवात होण्यापूर्वीच सारे ' दलित कामगार नगर 'स्त्री-पुरुषांच्या
प्रचंड जमावाने फुलून गेले होते. त्यात नगराची लतापताकांनी आणि
दिव्यांच्या प्रकाशाने. केलेली रोशनाई विशेष मनोवेधक दिसत
होती. कामगार नगरात: पुन्हा शांतता उत्पन्न होताच स्वागताध्यक्ष
श्री. पी. एन. बनकर यांनी आपले भाषण वाचून दाखविले. त्यांच्या भाषणानंतर
परिषदेचे उत्साही जनरल सेक्रेटरी, श्री. रामचंद्रराव पवार यांनी परिषदेच्या
कामकाजाचे, आमंत्रित मंडळींचे, प्रतिनिधींचे स्वागत केले आणि परिषदेसाठी
आलेले संदेश वाचून दाखविले. संदेशांपेकी अस्पृश्य समाजाचे एक प्रमुख
पुढारी मे. सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर यांचा संदेश विशेष महत्त्वाचा व
अस्पृश्य कामगारांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा [असा. ] [होता. ] [' ] [याशिवाय ]
रत्नागिरी उत्तर विभाग स्वतंत्र मजूर पक्षाच्या शाखेचे [अध्यक्ष ] [व ] [श्रमजिवी ] [वर्गाचे ] षुढारी भाई अनंतराव चित्रे यांचा महाडहून एक संदेश आला [होता. ] त्यांनी आपल्या संदेशात रत्नागिरी उत्तर भागातील शेतकरी [वर्गातफे ] [परिषदेचे ] [यश ] थिंतले होते. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या [चळवळीला ] नवीन दिवस दाखविण्यासाठी या परिषदेचे [अध्यक्षस्थान ] [स्वीकारल्यांबद्दल ] अत्यानंद व्यक्त केला आहे आणि त्यांच्या अतुल [पराक्रमाच्या ] [आणि ] [योग्य ] [अशा ] नेतृत्वाखाली मजुरांच्या चळवळीचा खात्रीने [भाग्योदय ] [होईल ] [आणि ] [त्यासाठी ] आपण सर्वांनी आपली जोमदार संघटना करून [प्रत्यक्ष ] [कार्याला ] [लागण्याचा ] [आजच ] संकल्प करावा वगैरे, अशी कळकळीची [विनंती ] [केली ] [आहे. ] [याशिवाय ] [इतर ] शुभ संदेश वाचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर [यांची ] [अध्यक्षपदी ] [रीतसर ] [निवड ] करण्यात आली. त्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात [अध्यक्षस्थान ] [स्वीकारताच ] त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला
डॉ. बाबासाहेबांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर छोटेसे प्रास्ताविक भाषण केले त्यात त्यांनी आपल्यावर या परिषदेच्या कार्याची मोठीच जबाबदारी .परिषदेच्या चालक मंडळीने टाकली असून त्यातून पार पाडण्यास आपण सर्वांनी साहाय्य