१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे - Page 134

९६ .. ` डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

करावे असे निवेदन केले. तसेच आज येथे जमलेले हजारो कामगार ३ आपली दुःखे वेशीवर टांगण्यासाठी इतक्या निर्भयपणे एकत्र जमलेले. पाहून म आनंद होत. आहे. .आपल्या सुख दुःखाचा विचार करून आपल्या अस अवस्थेतून आपणास कशारीतीने मार्ग काढता येईल यासंबंधी दुसरे दिवशी अध्यः या नात्याने आपल्या भाषणात आपले विचार मांडण्याचे आश्वासन दिले. .. परिषदेसाठी जी प्रमुख. आमंत्रित. मंडळी हजर राहिली होती त्यात श्री. नाईक, कमलाकांत चित्रे, द. -वि. प्रधान, आर. डी. कवळी, .भा. र. कद्रेकर,$ नागपूरचे मि. हरदास, एम. एल. ए., .डॉ. एस. सी. जोशी, भाऊराव कृष गायकवाड, भंगी समाजाचे पुढारी श्री. रामा शिवा पाला, ठाण्याचे शिवराम गो जाधव,. विठ्ठलराव रणखांबे, गणपतराव निळे, युवक परिषदेचे "स्वागताध्यक्ष, मुरलीधर पगारे, मनमाडचे माजी कौन्सिलर रामभाऊ जमधाडे, याशिवाय इतर प्रांतातील प्रमुख मंडळी हजर होती. आमदार मंडळींपैकी श्री..राजाराम भोळे, के..एस. सावंत, प्र. ज. रोहम, डी. जी. जाधव, वगैरे मंडळीही हजर: होती. ':

रविवारी सकाळी विषयनियामक कमिटीचे कामकाज संपल्यावर परिषदेच्या दुसऱ्या . दिवसाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. आज परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण होणार होते. परिषदेच्या कामाला थोडावेळ उशीराने सुरवात. झाली होती. . दलित कामगार नगरात्‌ ऊन पडू लागले होते तरी प्रचंड लोकसमुदाय डॉक्टर साहेबांचे भाषण ऐकण्यासाठी हजर होता. प्रथम काही मामुली. कार्यक्रम झाल्यावर डॉ. आंबेडकरसाहेब टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उभे राहिले.” १ | ठ

ते आपल्या भाषणात म्हणाले

मित्रांनो, जी. आय..पी. रेल्वेमध्ये. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही परिषद | आहे. यापूर्वी या प्रदेशात व इतर ठिकाणीही दलित वर्गाच्या अनेक परिषदा| झालेल्या असून त्या विशिष्ट अर्थाने ही पहिली परिषद नव्हे. परंतु दुसऱ्या अर्थाने पाहिले तर अशा प्रकारची ही पहिलीच परिषद आहे. यापूर्वी दलित वर्गाने ह सामाजिक अन्यायाचे निवारण करण्यासाठी तत्त्वशः लढा दिलेला आहे: त्यांच्या | आर्थिक तक्रारीसंबंधी दलित वर्ग प्रथमतःच या. परिषदेच्याद्वारा एकत्र: येत आहे. . आजपर्यंत परियांची परिषद म्हणून ते एकत्र येत होते. परंतु आज तुम्ही कामगार या नात्याने एकत्र येत आहात. . सामाजिक तक्रारी दूर करण्यावर |

आपण आजपर्यंतं आपले प्रयास केन्द्रित केले यात आपली काही चूक झाली, असे |

मला म्हणावयाचे नाही. : इतर लोक काहीही म्हणोत परंतु हे सामाजिक अन्याय

जनता : ५ फेब्रुवारी १९३८