डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे ९८
अर्थ घेऊ नये, असे मला लागतील, असे मी जे म्हणतो त्याचा चुकीचा कोणी
सत्ता, व तिचे हितसंबंध वाटते. ब्राह्मणशाही या शब्दाने ब्राह्मण जातीची हक्क
मला सूचवायचे नाहीत. त्या अर्थाने हा शब्द मी वापरीत नाही. ब्राह्मणशाही या शब्दाचा स्वातंत्र्य, समता व बंधूभाव या तत्त्वांचा अभाव, असा अर्थ मला अभिप्रेत आहे. या अर्थाने त्याने सर्व बाबींमध्ये कहर माजविलेला असून ब्राह्मण तिचे जनक असले तरी आता हा अभाव केवळ ब्राह्मणांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. या ब्राह्मणशाहीचा सर्वत्र संचार झालेला असून तिने सर्व वर्गाचे विचार व आचार नियंत्रित केले आहेत, ही निर्विवाद गोष्ट आहे. याशिवाय ही ब्राह्मणशाही काही विशिष्ट वर्गांना खास अधिकार देते ही सुद्धा दुमत न होणारी बाब आहे. ती काही इतर वर्गांना संधीची समानता सुद्धा नाकारते. ब्राह्मणशाहीचे दुष्परिणाम केवळ सहभोजन व आंतरजातीय विवाह या सारख्या सामाजिक
हक्कापर्यतच मर्यादित नाहीत.
जर इतकेच असते तर तिच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नसती. परंतु
केवळ इतकेच नाही. सामाजिक हक्कांपेक्षा वेगळ्या असलेल्या नागरी हक्कां-
पर्यंतही तिचा व्याप पसरलेला आहे. सार्वजनिक शाळांचा, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक वाहने, सार्वजनिक विश्रामस्थाने यांचा उपयोग करणे हे नागरी हक्कांचे विषय आहेत. सार्वजनिक फंडाद्वारे उभारण्यात आलेली किंवा
सार्वजनिक फंडाद्वारे चालविण्यात आलेली प्रत्येक बाब प्रत्येक नागरिकाच्या उपयोगासाठी खुली असली पाहिजे. परंतु असे कोट्यावधी लोक आहेत की
त्यांना हे नागरी हक्क नाकारण्यात आले आहेत. या देशात हजारो वर्षांपासून
मोकाट सुटलेल्या व विजेच्या जिवंत प्रवाहाप्रमाणे अजूनही कार्यशील असलेल्या
या ब्राह्मणशाहीचा हा परिणाम आहे. याबद्दल कोणाला शंका आहे काय ? ब्राह्मणशाही इतकी सर्वव्यापी आहे की आर्थिक संधीच्या प्रदेशावरही तिचा अंमल चालतो. दलितवर्ग कामगाराचे उदाहरण घ्या आणि इतर वर्गाच्या कामगारांबरोबर त्याची तुलना करून पाहा. रोजगार मिळविण्याच्या त्याला कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? नोकरीची सुरक्षितता व तिच्यातील प्रगतीच्या दृष्टीने त्याचे भवितव्य काय आहे ? तो अस्पृश्य असण्यामुळे अनेक उद्योगांचे दरवाजे त्याच्यासाठी बंद आहेत, ही कुप्रसिद्ध गोष्ट आहे. या मुद्याशी संबंधित कापड कारखान्यात घडलेला प्रसंग कुप्रसिद्धच आहे. भारताच्या इतर भागात काय घडते, याची मला कल्पना नाही. परंतु मुंबई इलाख्यातील मुंबई व अहमदाबाद येथील कापड गिरण्यातील विणाई विभागाचे दरवाजे दलित वर्गासाठी बंद आहेत, एवढे मला निश्चितपणे माहीत आहे. ते फक्त सूतकताई विभागातच काम करू शकतात. या सूतकताई विभागात सर्वात कमी पगार