१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे - Page 137

स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . . संघटनांचे ध्येय असावे ९९

आहेत. त्यांना विणाई विभागातून वगळण्यात आले याचे कारण म्हणजे ते अस्पृश्य आहेत ! आणि इतर हिंदू कामगार मुसलमान कामगारांसोबत काम करण्यास तयार असले तरी अस्पृश्य कामगारांसोबत काम करण्यास

तयार नाहीत!

रेल्वेचे उदाहरण घ्या. रेल्वेतील दलित वर्गाच्या कामगारांची स्थिती कशी आहे ? त्यांच्या नशिबात गँगमन म्हणूनच काम करणे आहे, हे कोणीही नाकबूल करू शकत नाही. दिवसेन्‌दिवस तो जन्मभर गँगमन म्हणून काम करीत राहातो आणि बढती होण्याची त्याला काही आशा नसते. त्याच्यासाठी वरच्या दर्जाची कोणतीच जागा खुली नाही, क्वचितप्रसंगीच त्याला पोर्टर नेमण्यात येते. त्याचे

कारण असे की पोर्टर असल्यामुळे त्याला स्टेशनमास्तरच्या घरची घरकामेही

आपल्या नोकरीचा एक भाग म्हणूनच करावयाची असतात. स्टेशनमास्तर हा बहुधा उच्च वर्गाचा हिंदू असतो व पोर्टर अस्पृश्य असल्यास या उच्चवर्णाच्या स्टेशनमास्तरच्या घरची घरेलू कामे करण्यास तो चालू शकत नसल्यामुळे दलित

वर्गापैकी असलेला पोर्टर निरुपयोगी ठरतो, हे त्याचे कारण आहे. म्हणून हा

स्टेशनमास्तर दलित वर्गातील माणसाला पोर्टर नेमण्याचे टाळतो. रेल्वेमध्ये

कारकुनाची पात्रता ठरविणारी एखादी परीक्षा घेण्यात येत. नसून मॅट्रिक

परीक्षा पास नसलेलेच बहुधा या जागी नेमण्यात. येतात. . भारतातील खिश्चन,

अँग्लो-इंडियन आणि उच्च वर्णाच्या हिंदूँपैकी शेकडो नॉनमेट्रिक कारकून

रेल्वेमध्ये नेमण्यात आलेले आहेत. परंतु दलित वगपिकी शेकडो मुलांना या

जागेसाठी पद्धतशीरपणे डावलण्यात आले असून कोणाला क्वचितच तशी संधी

मिळते. अशीच स्थिती रेल्वे वर्कशॉपमध्येही आहे. मेकॅनिकच्या जागी दलित

वर्गाच्या माणसाला क्वचितच नेमण्यात येते. मिस्त्रीची जागा दलित वर्गाच्या

माणसाला देण्यात आली, असे उदाहरण मुश्किलीने आढळेल. त्याला

वर्कशॉपमध्ये फोरमन किंवा चार्जमन क्वचितच करण्यात येते. तो फक्त हमाल

आहे आणि हमालच राहतो. दलित वर्गाची रेल्वेतील अवस्था अशी आहे. ज्या

उद्योगात त्याच्या पात्रतेनुसार काम मिळण्याची आशा असते तेथे त्याला खालच्या

जागेवर नेमण्यात तर येतेच परंतु तो रिटायर होईपर्यंत त्याला तेथेच ठेवण्यात

येते. त्याच्यासाठी उत्कर्ष नाही, त्याला प्रगतीची आशा नाही आणि बहुधा

त्याच्यासाठी बढतीही नाही ! कामगारांची मागणी घटली नसली म्हणजे

त्याच्याबाबतीत हे असे घडते, परंतु कामगारांची मागणी जर कमी झाली असेल

तर सर्वप्रथम त्याला खडसावण्यात येते की नोकरी मिळण्यासाठी त्याचा आखरी

क्रमांक आहे.