स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . . संघटनांचे ध्येय असावे १०१
चालणे, ही एक फार मोठी चूक आहे. कामगारांचे सैन्य अधिक मजबूत कसे करू शकू ? कामगारांमध्ये आपण ऐक्य कसे प्रस्थापित करणार आहोत ?
कामगारांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर अन्याय करून निश्चितच नव्हे, अन्याय झालेल्या गटाला संघटित होण्यास अडथळा करूनही नव्हे किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी त्या अन्यायाविरुद्ध चळवळ उभारण्यास आडकाठी करूनही नव्हे! वंश आणि धर्मामुळे एक कामगार दुसऱ्याचा शत्रु बनत असल्यामुळे कामगारांच्या ऐक्यामध्ये आड येणारी ही कारणे नष्ट करणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय. एक कामगार दुसऱ्या कामगाराला हक्क देऊ शकत नाही, ते स्वतःसाठी मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हे त्यांना सांगणे हाच खरा कामगारांच्या एकीचा उपाय होय. सामाजिक दृष्टीने उच्च, नीच भेदभाव मानणे व पाळणे हे तत्त्वत: चूक असून कामगारांच्या संघटनेला ते फार घातक आहे, हे कामगारांना सांगणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे आपण ब्राह्मणशाही-असमानतेची कल्पना कामगारातून समूळ नष्ट केली पाहिजे. परंतु कामगारांमध्ये अशाप्रकारची स्फूर्ती निर्माण करणारे
कामगार पुढारी कोठे आहेत ? भांडवलशाही विरूद्ध जोरजोराने भाषण देताना
कामगार पुढाऱ्यांना मी ऐकले आहे. परंतु कामगारांमध्ये असलेल्या
ब्राह्मणशाहीविरुद्ध बोलताना मी कोणत्याही कामगार पुढान्याला ऐकलेले
नाही. या उलट या मुद्यावरील त्यांचे मौन स्पष्टपणे दिसून येत
आहे. ब्राह्मणशाहीवर श्रद्धा असल्यामुळे व कामगारांच्या ऐक्याशी त्यांचे काही
कर्तव्य असो की नसो, ब्राह्मणशाहीचा कामगारांच्या बेकीशी काही संबंध आहे
असे त्यांना वाटत नसल्यामुळे त्यांचे हे मौन असो की नसो किंवा केवळ कामगारांचे
पुढारीपण मिरविण्याची हौस असल्यामुळे कामगारांच्या भावना दुखविल्या जाऊ
नये म्हणून त्यांचे हे मौन असों की नसो, याची चौकशी करण्यासाठी मी खोळंबून
राहात नाही. तथापि, मला हे सांगितलेच पाहिजे की ब्राह्मणशाही ही
कामगारातील फुटीचे जर मूलभूत कारण असेल तर ती कामगारांमधून काढून
टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न झाला पाहिजे. हा साथीचा रोग केवळ दुर्लक्ष
केल्यामुळे जाणार नाही किंवा त्याबद्दल मौन राहिल्यानेही जाणार नाही. त्याचा
पाठपुरावा केला पाहिजे व त्याची मुळे खोदून काढली पाहिजेत. तरच
कामगारांच्या ऐक्याचा मार्ग मोकळा होईल.
जोपर्यंत ब्राह्मणशाही ही एक प्रचलित जिवंत शक्ती आहे आणि जोपर्यंत लोक
तिला आपापल्या अधिकाराच्या स्वार्थामुळे चिकटून आहेत व इतरांवर बंधने लादत
आहेत तोपर्यंत यापासून ज्यांना यातना होतात त्यांना याविरुद्ध संघटित होणे भाग