ध्येय असावे १०३
समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . - संघटनांचे स्वातंत्र्य,
करावयाचे असेल तर अन्यायांचे परिमार्जन जर तुम्हाला तुमच्यावरील
उद्भवत नाही. पुढील प्रश्न असा उभारू नये हा प्रश्नच त्यासाठी तुम्ही संघटन
? कोणते ध्येय साध्य करून घ्यावयाचे आहे तुमच्या की तुमच्या संघटनेला
उद्योगविषयक हेतूसाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे हे न सांगताही
कळण्यासारखे आहे. परंतु प्रश्न असा की या हेतुसाठी तुम्ही वेगळे संघटन
उभारावे की आधीच अस्तित्वात असलेल्या एखाद्या संघटनेत सहभागी
व्हावे ? कार्यवाहीला प्रत्यक्ष सुरवात करण्यापूर्वीच तुम्ही या प्रश्नाचा गंभीरपणे
विचार करावयास हवा.
भारतातील कामगार संघटने हा एक खेदाचा विषय आहे. कामगार
संघटनेचा मुख्य उद्देश पूर्णतः दृष्टिआड झालेला आहे. कामगार वर्गाच्या
जीवनस्तराचे कमी होण्यापासून संरक्षण करणे हा कामगार संघटनांचा मुख्य उद्देश
आहे. जन्मापासून व प्रशिक्षणामुळे जाणीव झाल्यामुळे युरोपातील प्रत्येक माणूस
आपला जीवनस्तर समाधानकारकपणे योग्य स्थितीत ठेवण्याचा सतत प्रयत्न
करीत असलेला दिसतो. तो कमी करण्याचा कितीही भयानक प्रयत्न झाला तरी
त्याला तो प्रतिकार करतो. भारतीये कामगारात हा दृढनिश्चय आढळून येत
नाही, ही एक सुप्रसिद्ध बाब आहे. केवळ जिवंत राहण्यासाठीच तो धडपडत
असतो आणि मिलने दर्शविल्याप्रमाणे " जेथे कोठे या निकृष्टतेकडे नेण्याच्या
प्रयत्नांना निग्रही प्रतिकार करण्याची व समाधानकारक जीवनस्तर सांभाळण्याची
लोकांची वृत्ती नाही तेथे मोठमोठ्या प्रगतीकारक राष्ट्रातही गरीब लोकांची अवस्था
केवळ जीव धारण करण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचते “. माझ्या मते, जर
कामगार संघटनांची नितांत आवश्यकता असणारा कोणता एखादा देश असेल
तर तो भारत हाच होय. परंतु मी म्हटल्याप्रमाणे, भारतातील आजचे कामगार
रांघटन हे एक दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे डबके झालेले आहे. याचे प्रमुख कारण
म्हणजे कामगारांचे नेतृत्व एक तर भित्रे, स्वार्थी किंवा पथभ्रष्ट आहे. त्यात काही
असेही नेते आहेत की जे केवळ आरामखुर्चीवरचे तत्त्वज्ञानी आहेत किंवा केवळ
वर्तमानपत्रात आपले वक्तव्य प्रसिद्ध करण्यातच खून असणारे राजकारणी
आहेत. कामगारांना संघटित करणे, त्यांना शिक्षित करणे आणि संघर्षामध्ये
त्यांना मदत करणे हा त्यांच्या कर्तव्याचा भागच नाही. ते केवळ कामगारांचे
प्रतिनिधीत्व करण्यासाठी व त्यांच्यावतीने बोलण्यासाठी चिंतातूर तर
आहेत, परंतु कामगारांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवण्याचे मात्र ते टाळतात. कामगार
नेत्यांचा दुसरा प्रकार असा की, ते केवळ स्वतःला सेक्रेटरी, अध्यक्ष किंवा असेच
एखादे पद मिळविण्याच्या हेतुने कामगारांच्या संस्था उभारण्यात दग
राहातात. त्यांची ही पदे सांभाळण्यासाठी ते आपल्या संस्था नेहमी वेगळ्या व
परस्परविरोधी ठेवण्याचा प्रयत्न करताल. कधी कधी तर असेही लज्जास्पद