स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . . संघटनांचे ध्येय असावे १०५
याचा परिणाम असा झाला की कामगारांनी जिच्यावर विसंबून राहावे अशी एकही संघटना अस्तित्वात राहिली नाही. मुंबईच्या कापड गिरण्यात जी अस्वस्थता पसरली आहे तिच्याबद्दल मी बोलत नाही. त्यासंबंधी जितके कमी बोलले जाईल तितके बरे. परंतु जी. आय. पी. रेल्वे कामगारांचे संघटन १९२०
साली उभारण्यात आले. ते १९२२ ते १९२४ पर्यंत मृतप्रायच होते. त्याचे पुनरूज्जीवन १९२५ साली करण्यात आले. १९२७ मध्ये दुसरे एक संघटन ' जी. आय. पी. रेल्वेमेन्स युनियन ' या नावाने काढण्यात आले. १९३१ साली या दोन्ही संघटनांमध्ये ऐक्य करून ' रेल्वे वर्कर्स युनियन ' ही संस्था काढण्यात आली. १९३२ मध्ये या संस्थेत पुन्हा फूट पडली आणि ' रेल्वे लेबर युनियन ' या नावाने दुसरी एक संस्था काढण्यात आली. १९३५ मध्ये जुन्या ' जी. आय. पी. स्टॉफ युनियन ' चे पुनरुज्जीवन करण्यात आले आणि नवीन संस्था म्हणून सुरू करण्यात आली. ती आता मान्यता पावलेली संस्था असून रेल्वे कामगारांच्या हितासाठी जपणाऱ्या या संघटनांमध्ये जोरदार विरोध व शत्रुत्व आहे. कम्युनिस्ट पुढारी व कम्युनिस्ट नसलेल्या रेल्वे कामगार पुढाऱ्यांमध्ये नेतेपदासाठी चाललेल्या चढाओढीचा हा सारा परिणाम आहे. अशाच शत्रुत्त्वामुळे केन्द्रीय संघटनेमध्येही फूट पडलेली आहे ' ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ' ही कामगारांची केन्द्रीय संघटना १९१९ साली स्थापन करण्यात
आली. कामगारांच्या सर्व संघटना या काँग्रेसला १९२९ पर्यंत जोडून देण्यात आल्या होत्या. १९२९ साली नागपूरला फूट पडली आणि कम्युनिस्ट पुढाऱ्यांचे
नेतृत्त्व नाकारणारे फूटून बाहेर पडले व त्यांनी ' नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन '
या नावाची नवीन संस्था स्थापन केली. या दोन संस्थांमध्ये तीव्र स्वरूपाचा
शत्रुभाव कार्यरत आहे. १९३१ व १९३२ साली या दोन विरोधी संस्थांमध्ये एकी
घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो अयशस्वी झाला. त्याबाबत
आताही प्रयत्न होत आहेत. त्यातून काय निष्पन्न होणार आहे कोणास
ठाऊक. अशा परिस्थितीत तुम्हाला काही उपदेश करणे माझ्यासाठी मोठे
कठीण काम आहे. जर तुमच्याजवळ अशी संस्था सांभाळण्यासाठी माणसे
असतील तर तुम्ही तुमचे स्वतःचे वेगळे संघटन उभारले असते तरीसुद्धा त्यात
काहीही वाईट झाले नसते. अर्थात ही एक मोठी अट आहे. एखाद्या
संघटनेची भरभराट व्हावयाची असल्यास तिने कार्य केले पाहिजे आणि कोणतीही
संघटना जर समर्थ व्यक्तींची सेवा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरली तर
ती कार्य करू शकत नाही. तुमचे संघटन चालविण्यासाठी अशी माणसे तुम्ही
मिळवू शकाल काय ? जर तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही स्वतःचे संघटन
तयार करा. वस्तुतः तुम्ही जर असे केले तर अधिक चांगले होईल. कारण
विभिन्न संघटनांचा परिणाम विभक्ततेच्या भावनेत किंवा दुर्बलतेत होतोच असे