१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे - Page 145

स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . . संघटनांचे ध्येय असावे १०७

तिच्या जागी स्वातंत्र्य समता व बंधूभाव या तत्त्वांवर आधारलेली नवी पद्धती स्थापन करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. याचा अर्थ, समाजाची पुनर्रचना आणि अशाप्रकारची पुनर्रचना समाजात घडवून आणणे हे कामगार वर्गाचे प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. परंतु कामगार वर्ग हे ध्येय कसे साध्य करू शकेल ? राजकीय शक्‍तीचा परिणामकारक उपयोग झाल्यास याबाबतीत ते निश्‍चितच एक शक्तीशाली साधन ठरते. मग त्यांनी राजकीय शक्ती साध्य केली पाहिजे. कामगार संघटनेने राजकारणापासून अलिप्त.राहणे याचा अर्थ कामगारांनी व्यक्तिशः राजकारणात भाग घेऊ नये, असा नव्हे. याउलट त्यांच्यापैकी अनेक राजकीय सभांना हजर राहतील, एखाद्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करतील. कोणी नेहमी एखाद्या राजकीय पक्षात सहभागी राहील. कामगार संघटनांना ' राजकारण नको ' याचा अर्थ त्या संघटनेच्या कामगार सदस्यांना राजकारण नको असा नाही. ' राजकारण नको' ही

धोक्याची सूचना फक्त पक्षबद्ध राजकारणासाठी आहे. अशा स्थितीत प्रत्येक

व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आवडीप्रमाणे स्वतंत्ररीत्या राजकारणात भाग घेऊ

शकते. जर त्याच्या कामगार बांधवांच्या सहकार्याने त्यांचे स्वतःचे संघटन

उभारण्यात आले असेल तर त्याच क्षणी त्याला राजकारणातून बाहेर पडावे

लागेल. अशाप्रकारे स्वतःच्या वर्गाच्या उद्दिष्टांसाठी त्याच्या व्यक्तिगत

शक्तीला नियंत्रित करून राजकारणातून बाहेर पडावे लागेल. यामुळे ही

कामगारांची संघटना निश्‍चितपणे भांडवलशाहीवादी राजकीय पक्षाचे कुरण

ठरल्यावाचून राहणार नाही. तुम्हाला बहुतकरून माहीत असेलच की,

कामगारांच्या नावाने बोलण्याचा अधिकार सांगणाऱ्या ट्रेड युनियन काँग्रेस आणि

ट्रेड युनियन फेडरेशन या दोन्ही संघटना आता एका संघटनेत विलीन होण्याच्या

मार्गावर आहेत. प्रत्येकीने आपल्या अर्ध्या धोरणाचा त्याग करून ऐक्य

घडविण्याचे ठरविले आहे. ट्रेड युनियन काँग्रेसने, ट्रेड युनियन फेडरेशनची

घटना स्वीकारली असून ट्रेड युनियन फेडरेशनने आपल्या नावाचा त्याग

करण्याचे ठरविले आहे. मला असे कळले की, या ऐक्यामधील एक अट

ही संघटना विशुद्धपणे कामगार संघटनेच्या स्वरूपाची असावी, अशी आहे. तिला

राजकारणाशी कर्तव्य राहाणार नाही. जेव्हा मी हे ऐकले तेव्हा या सद्गृहस्थांना

त्यांच्या म्हणण्याचा अर्थ खरोखर समजला की नाही याबद्दल मला नवल

वाटले. स्वत:च्या हातातील राजकीय शक्तीचा उपयोग आपल्यावरील अन्यायाच्या ` निवारणासाठी वापरण्यावर बंधने घालण्याचा हा सांधा प्रकार असून हा मोठा

खेदजनक प्रकार आहे. जर या एकत्रित झालेल्या कामगार संघटनेला आपली

एकत्रित राजकीय शक्ती वापरावयाची नाही तर ती कशासाठी एकत्रित आली,

हेच मला कळत नाही. क्षुल्लक स्वरूपाचे मतभेद असले आणि ते जर दुसऱ्या