१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे - Page 146

१०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

एखाद्या मोठ्या उद्देशासाठी मिटविले तर ' तडजोड ' या शब्दाला काही अर्थ प्राप्त होतो. परंतु जर एखाद्या मोठ्या प्रश्‍नाबद्दल लोकांमध्ये मतभेद असले तर त्यांचा त्याग करून केवळ क्षुल्लक बाबींच्या स्वीकारासाठी एक होण्यात ' ऐक्य या शब्दाला काही अर्थच उरत नाही. इतरांचा याबाबत कोणताही दृष्टिकोन असो परंतु मी असेच म्हणेन की कामगारांनी राजकारणापासून अलिप्त राहाण्याची जर संघटितपणे शपथ घेतली तर त्यांना तो एक अभिशापच ठरेल.

आपण मात्र यापुढे आपले प्रयत्न सामाजिक सुधारणेच्या एकाच दिशेने ठेवणे आवश्यक आहे, हे ओळखले पाहिजे आणि आजपर्यंत आपण आर्थिक सुधारणेसाठी प्रयत्न केला पाहिजे हे विसरून गेलो होतो किंवा फारच अल्प प्रयत्न केले. आपणाला जे अन्याय सहन करावे लागतात याचे मूळ एकच आहे व ते म्हणजे ज्यांच्या हातात सामाजिक व आर्थिक शक्ती आहे त्यांनी कामगारांचे राजकीय हक्कही हिरावून घेतलेले आहेत हेच होय.

राजकारणात शिरणे याचा अर्थ आपला पक्ष स्थापन करणे असा होतो. पक्षाचा पाठिंबा नसलेले राजकारण ही एक कल्पनेतील वस्तू होय. स्वतंत्रपणे राजकारण चालविण्याचा व आपली पोळी आपणच पकविण्याचा प्रयत्न करणारे अनेक राजकारणी पुरुष आहेत. जो राजकारणी असा स्वतंत्र राहाण्याचा प्रयत्न करतो त्याच्याबद्दल मी नेहमीच सतर्क असतो. जर एखादा राजकारणी माणूस कोणातही सहभागी न होण्याइतका स्वतंत्र असेल तर कोणत्याही राजकीय उद्दिष्टासाठी तो निरर्थक आहे. तो काहीच साध्य करू शकत नाही. त्याच्या एकाकी प्रयत्नाने गवताचेही पीक तो काढू शकत नाही. परंतु स्वतंत्रतेची हाव धरणारे राजकारणी पुरुष त्यांच्या बौद्धिक प्रामाणिकतेमुळे स्वतंत्र राहात नाहीत, तर जास्तीत जास्त मागण्या मागण्यासाठी ते तसे स्वतंत्रपणे राहातात. यामुळेच त्यांना पक्षशिस्तीच्या जाळ्यातून मुक्त राहावयाचे असते. ते काहीही असो, परंतु राजकारणात स्वतंत्र राहणाऱ्या अनेक राजकीय मुत्सद्यांबद्दलचा माझा अनुभव तरी असाच आहे. पक्षाशिवाय खरेखुरे आणि | परिणामकारी राजकारण असूच शकत नाही.

प्रश्‍न असा की कोणत्या पक्षात तुम्ही सामील व्हावे ? अनेक पर्यायी पक्ष आहेत. काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसमध्ये तुम्ही सामील व्हावे. काय ? कामगारांच्या उद्दिष्टांना ती मदत करील काय? काँग्रेसपासून स्वतंत्र असा स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा. असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही. या माझ्या मताला कामगार पुढाऱ्यांचा विरोध आहे, हे मला माहीत आहे. काँग्रेस सोशिऑलिस्टांचे