स्वातंत्र्य. समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . . संघटनांचे ध्येय असावे १०९
| प्रतिनिधित्व करणारा एक गट असून समाजवादाच्या पूर्तीसाठी त्यांना कामगार संघटन हवे आहे परंतु ही संघटना काँग्रेसच्या अंतर्गतच राहिली पाहिजे, असे त्यांना वाटते. श्री. रॉय यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला व स्वतःला कम्युनिस्ट म्हणवून घेणारा एक गट आहे. त्यांचा कामगारांच्या दुसऱ्या कोणत्याही संघटनेला जोरदार विरोध आहे, मग ती संघटना काँग्रेसच्या अंतर्गत
असो की बाह्यगत असो. या दोन्ही गटांशी मी पूर्णतः असहमत आहे.
श्री. रॉय हे मला जसे एक कोडे वाटते तसे पुष्कळांना वाटत असले पाहिजे. एक कम्युनिस्ट आणि स्वतंत्र कामगार संघटनेला विरोधी ! भयानकपणे विरोधी शब्द . | आहेत हे! हा असा दृष्टिकोन आहे की, आपल्या थडग्यामध्ये लेनिननेही तडफडाट करावा. या विलक्षण दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण एकच होऊ शकते. ते है की, भारतीय राजकारणाचे सर्वात महत्त्वाचे ध्येय साम्राज्यशाहीचा नाश करणे (हे आहे, असे रॉय यांना वाटत असले पाहिजे. श्री. रॉय यांनी जे मत स्वीकारले राहे त्याचा दुसरा कोणताही अर्थ निघत नाही. जर साम्राज्यशाही नष्ट झाल्याबरोबर भारतातील सर्व भांडवलदारांचे हितसंबंध नष्ट होणार असतील तरच है मत बरोबर ठरू शकेल. परंतु इंग्रज या देशातून निघून गेले तरी या देशात जमीनदार, मिल मालक व सावकार कायम राहून लोकांची पिळवणूक चालूच राहाणार आहे आणि साम्राज्यशाही नष्ट झाल्यावरही आजच्याप्रमाणेच कामगारांना 'था भांडवलदारांशी संघर्ष करावा लागणारच आहे, हे समजण्यास फार मोठ्या बौद्धिक चातुर्याची गरज आहे, असे नाही. असे असल्यामुळे कामगारांनी आतापासूनच संघटित का होऊ नये ? संघटनेची वाढ करण्यामध्ये त्यांनी
खोळंबून का राहावे ? मला तर याचे कोणतेच उत्तर दिसत नाही. काँग्रेस ्षमाजवाद्यांना हे पूर्णपणे माहीत आहे की, कामगारांना साम्राज्यशाहीप्रमाणेच
भांडवलशाहीशीही संघर्ष करावा लागणार आहे व म्हणून कामगारांनी संघटित
झाले पाहिजे, हे त्यांना मान्य आहे. परंतु त्यांची अशी अट आहे की, कोणतीही
फ्ामगार संघटना काँग्रेसच्या अंतर्गतच असली पाहिजे. कॉग्रेस आणि कामगार
बांच्या या जबरदस्तीच्या समझोत्याची आवश्यकता किंवा मूल्य मला तरी काहीच
दिसत नाही. काँग्रेस सोशिऑलिस्ट लोकांच्या म्हणण्याप्रमाणे देशात समाजवाद
आणणे हे त्यांचे ध्येय आहे. ते समाजवाद कसा आणणार आहेत ? काँग्रेसचा
उजवा हात होऊन ! काँग्रेसच्या बाहेर न पडण्याचे ते हे कारण देतात. त्यांचे
मानवी स्वभावाविषयीचे ज्ञान ही इतकी कीव करण्यासारखी बाब आहे की त्याची
कल्पनाही करणे कठीण आहे. जर त्यांचे उद्दिष्ट समाजवाद आणणे हे असेल
सर त्याचा उपदेश लोकांना करून अपेक्षित कार्यासाठी त्यांना संघटित करणे
गरजेचे आहे. उच्च वर्णियांची मनधरणी करून समाजवाद येणार नाही. काँग्रेसची
उजवी बाजू समजणाऱ्या लोकांना समाजवादाची लहानशी मात्राही सहन होऊ