|
|
|
डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे ११७
स्पष्ट होत ती अधिकाधिक ही वस्तुस्थिती असून दिवसेंदिवस शकत नाही,
आंदोलन उभारले समाजवादाचे वादळी आहे. पंडित नेहरूंनी मागीलवर्षी
लवकरच ताळ्यावर आणण्यात येऊन होते. परंतु या गरीब बिचाऱ्या इसमाला
एखाद्या उनाड मुलाला लडडूपेढ्यावर ताव मारण्यास घरी परत पाठवावे त्याप्रमाणे केवळ यापुढे चांगले वागण्याच्या करारावर घरात घेण्यात आले. आता हा पंडित पूर्णपणे पालटलेला असून आता इतका गरीब झाला आहे की, त्याने एकदा घुमविलेल्या व सध्या काँग्रेसचा उजवा हात म्हणून शापित असलेल्या लाल निशानालाही तो विरोध करतो. बिहारमधील या उजव्या बाजूने आपले खरे दात दाखविले आहेत. किसान पुढारी स्वामी सहजानंदानी काँग्रेस सोडलेली असून त्याचा सहकारी जयप्रकाश नारायण हाही तिचा त्याग करण्याच्या मार्गावर आहे. मला असे कळले की, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मुंबई येथील सभेत काँग्रेसच्या या उजव्या बाजूकडील लोकांनी सोशिऑलिस्टांच्या गैरशिस्त वर्तनाबद्दल निंदा केली आणि काँग्रेसच्या व्यासपीठावरून समाजवादाचा
प्रचार करण्याचा आरोप लादून इंडियन पिनल कोडप्रमाणे प्रथम गुन्हा
करणाऱ्याला जशी ताकीद देण्यात येते त्याप्रमाणे ताकीद देण्यात
आली. काँग्रेसमधील समाजवाद्यांची अशी पोकळ दशा आहे.
साम्राज्यवादाच्या प्रतिक्रियेमुळे भारतीय राजकारण झाकाळून गेले
आहे. कामगारांना त्यांच्या खऱया शत्रूंचा म्हणजे अधिकार बळकावून बसणाऱ्यांचा विसर पाडण्यात आला. रॉयवादी व काँग्रेसवादी हे दोन्ही प्रकारचे समाजवादी
लोक विचारातील गोंधळामुळे दलदलीत रुतून बसलेले आहेत. एक सामान्य
शत्रू म्हणून या साम्राज्यशाहीविरूद्ध संघर्ष करावयाचा असेल तरी सर्व वर्गांनी
आपापल्या वर्गाच्या हिताकडे दुर्लक्ष केले पाहिजे व एका संघटनेत विलीन झाले
पाहिजे, असा त्याचा अर्थ होत नाही. वेगवेगळ्या वर्गाच्या संघटनांची एक फळी
उभारूनही या साम्राज्यशाहीशी लढाई करता आली असती. या हेतूसाठी सर्व
संघटना बरखास्त करण्याची काहीच गरज नाही. सर्व संघटनांचा समावेश
करून घेणाऱ्या संस्थेचीही काही आवश्यकता नाही. त्यासाठी सर्वांची मिळून
एकच एक फळी उभारली म्हणजे पुरे झाले. काँग्रेसची ही उजवी बाजू
साम्राज्यवादाच्या नावाने कोणतीही स्वतंत्र व वेगळी संघटना उभारण्याच्या आड
येत आहे, हे पुष्कळांनी अजून ओळखलेले नाही, याची जाणीव करून देताना मला खेद वाटतो आणि ही चूक तुम्हीही कराल, अशी मी तुम्हास धोक्याची सूचना देत
आहे. राजकारण हे वर्गहिताच्या जाणिवेवर उभारल्या जावयास पाहिजे. जे राजकारण वर्गहिताच्या पायावर उभे नसेल ते एक ढोंग आहे.