स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . . संघटनांचे ध्येय असावे १११
` म्हणून जो पक्ष वर्गहिताच्या, वर्गजाणिवेच्या पायावर आधारलेला असेल अशा पक्षामध्ये तुम्ही सामील व्हावे. ही कसोटी लावून पाहिल्यास तुमच्या हिताच्या विरोधी नसलेला, मला माहीत असलेला पक्ष म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष हा होय. स्पष्ट कार्यक्रम असलेला तो एकच पक्ष असून कामगारांच्या हिताला तो
सर्वोच्च स्थान देतो. त्याचे धोरण सुनिश्चित आहे. तो सामान्य परिस्थितीत
कधीही असनदशीर मार्गाचा अवलंब करणार नाही परंतु तशी पाळी आणल्यास
मागेपुढेही पाहाणार नाही. वर्गयुद्ध टाळण्याची त्याची इच्छा असली तरी वर्ग
संघटनेच्या तत्त्वाचा त्याग करावयास तो तयार नाही. आज हा स्वतंत्र मजूर
पक्ष (इन्डिपेन्डन्ट लेबर पार्टी) बालवयात आहे आणि तो केवळ मुंबई
इलाख्यापुरताच मर्यादित आहे, हे खरे ; परंतु हा काही त्याच्याविरोधी युक्तिवाद
नव्हे. प्रत्येक पक्ष एकेकाळी बालवयात असतोच. एखादा पक्ष किती वयाचा
आहे. हा प्रश्न महत्त्वाचा नाही तर त्याची तत्त्वे काय आहेत, तो काय साध्य करू
इच्छितो आणि त्याची सूप्त शक्ती काय आहे, या बाबीच महत्त्वाच्या
आहेत. स्वतंत्र मजूर पक्षाचे घोषणापत्र वाचून पाहण्याची जो तसदी घेईल
त्याला त्याची तत्त्वे काय आहेत व तो काय साध्य करू इच्छितो हे कळून
येईल. या पक्षात फार मोठी सूप्त शक्ती आहे, हे स्पष्ट आहे. हा पक्ष मर्यादित
नाही. जात आणि पंथ याचा विचार न करता सर्वाना तो खुला आहे. त्याचा
कार्यक्रम काहीसा दलित वर्गाच्या गरजांवर भर देत असला तरी संपूर्ण कामगार
वर्गाच्या गरजांचा समावेश होण्याइतका तो विस्तृत आहे. या स्वतंत्र मजूर
पक्षाच्या भरभराटीच्या आड येणारी एक अडचण राजकीय नव्हे तर सामाजिक
आहे. या पक्षाच्या केन्द्रस्थानी दलित वर्गाचे लोक सध्या आहेत. ही
वस्तुस्थिती मुख्यतः या पक्षाच्या भरभराटोच्या व विस्ताराच्या आड येत
आहे. दलित वर्गासारख्या कमी दर्जाच्या लोकांबरोबर सहकार्य करावयाचे
नाही. अशी सर्वसाधारण भावना आहे. तिने उच्च वर्गाच्या हिंदुंना स्वतंत्र
मजूर पक्षामध्ये भाग घेण्यापासून वंचित केले आहे आणि जे लोक या पक्षाच्या
उण्यावर आहेत ते या भावनेचा दुरुपयोग करून घेऊन अडाणी व धर्मभोळ्या
लोकांना या पक्षात सामील होण्यापासून परावृत्त करीत आहेत. परंतु स्वतंत्र
मजूर पक्षाचे स्वच्छ व प्रामाणिक राजकारण सर्व कामगार वर्गाला आपल्या
ध्वजाखाली खेचून आणण्यास लोहचुंबकाप्रमाणे उपयुक्त ठरेल आणि हिंदू समाज
रचनेमुळे निर्माण झालेल्या विरोधी शक्तीला प्रतिकारक शक्ती ठरेल, अशी माझी
खात्री आहे. आतापर्यंत ठाणा, कुलाबा आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांमध्ये
या पक्षाची पूर्णतः स्थापना झाली असून शेतकरी व कामगारात आपला पाया तिने