१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे - Page 150

डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे ११२

जोरदार प्रसार सुरू रचलेला आहे. या प्रांताच्या अन्य भागातही त्याचा

पक्ष असून भारताच्या अन्य आहे. मध्यप्रांत आणि वऱ्हाडातही हा कार्यरत

म्हणून प्रांतातही तो आपली जागा पटकावील, अशी मला आशा वाटते. कामगार वर्गाचा न्याय्य पाठिंबा मिळण्यास स्वतंत्र मजूर पक्ष हाच एकमेव पक्ष पात्र

आहे.

कामगारांच्या संघटनांमधील दलित वर्गाचे लोक भारतातील संपूर्ण कामगार वर्गाला फार मोठी चालना देऊ शकतात. इंग्लंडमधील चार्टिस्ट चळवळीचा अभ्यास करणाऱ्या गॅमेज याने म्हटले आहे, " सामाजिक प्रश्‍नावर आधारित असण्यावाचून एखादी राजकीय चळवळ आजतागायत कधी झाली असेल की नाही याबद्दल शंकाच आहे. मानव जातीचा मुख्य हेतू सामाजिक सुखोपभोगाची

साधने हस्तगत करणे हाच आहे. या साधनांची मालकी त्यांना मिळाल्यास

राजकीय भानगडीमध्ये रस घेण्याची त्यांची वृत्ती अगदीच कमी होते. सामान्य

जनतेला राजकीय हक्कांचे महत्त्व ततत्वशः पटवून देण्याचे कार्य जर कोणी करीत असतील तर ते समाजामध्ये अस्तित्त्वात असलेले दोषच होय. " तुमचे

सामाजिक दोष मोठेही आहेत आणि वास्तवही आहेत. त्यामुळे तुमचे राजकारणही अस्सल व वास्तव राहू शकते. हे जर तुम्ही समजून घेतले तर अस्सल राजकीय

पक्षाच्या बाबतीत तुम्ही भारतातील संपूर्ण कामगार वर्गाला दीपस्तंभाप्रमाणे

मार्गदर्शक ठराल. संपूर्ण कामगारांची दुसरीही एक सेवा तुम्ही करू शकता. विधानसभेत तुरहाला प्रतिनिधीचा एक निश्‍चित वाटा. मिळालेला

आहे. या सुनिश्चित जागांचा उपयोग कामगार वर्गाला किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव काही कामगार नेत्यांना असल्याचे दिसत नाही. निवडणूक हा एक प्रकारचा जुगार आहे. कोणत्याही पार्टीला विधानसभेत अमुक इतक्या जागा मिळतीलच अशी कोणत्याही निवडणुकीच्या पद्धतीने खात्री देता येण्यासारखी नसते. इतकेच नव्हे तर मतदारांच्या एखाद्या गटाला कोणत्याही निवडणूक पद्धतीने त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळतील असेही नाही. निवडणुकीचे निकाल काही पक्षांना कधी कधी किती आश्‍्यर्चकारक व विनाशकारी ठरले, हे इंग्लंडमधील निवडणुकीच्या इतिहासावरून दिसून येईल. बऱ्याचदा अल्पसंख्यांक मतदारांनाच बहुसंख्य जागा मिळतात. आपल्या येथे निश्‍चित जागा ठरलेल्या असल्यामुळे तशी भीती बाळगण्याचे कारण नाही आणि दलित वर्गाच्या राखीव जागांचा विचार करता त्या केवळ दलित वर्गच्याच उपयोगाच्या आहेत, असे नसून त्या सर्व कामगार वर्गाला उपकारक आहेत. दलित वर्गाला निश्‍चित प्रतिनिधीत्व मिळण्याची खात्री असल्यामुळे