स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर . . . . संघटनांचे ध्येय असावे ११३
अन्य कामगार वर्गाला मदतीची आवश्यकता वाटल्यास त्यांच्या संघटनांच्या
उभारणीमध्ये तो फार मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत होऊ शकतो. कामगार
वर्गाला राजकीय प्रतिनिधीत्व मिळविण्यासाठी दलित वर्गाचा किती उपयोग होऊ
शकतो हे मागील निवडणुकीमध्ये सिद्ध झालेले आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या
तिकिटावर उभे राहणाऱ्या तीन हिंदूंना दलित वर्ग मुंबई विधानसभेसाठी निवडून | आणू शकला आणि स्वतंत्र मजूर पक्षाच्या तिकिटावर उभे नसलेल्या परंतु दलित
वगाचा पाठिंबा असलेल्या अनेक उमेदवारांना त्याने निवडून येण्यास मदत केली. ज्यांना आमच्या प्रयत्मांपासून हित साधून घ्यावयाचे असेल त्यांनी करून ध्यावे परंतु या देशाच्या राजकारणात दलित वर्ग महत्त्वाची भूमिका वठवू शकतो,
ही वस्तुस्थिती शिल्लक राहतेच आणि ही भूमिका त्यांच्या स्वतःसाठी व कामगार
वर्गासाठीही अत्यंत सहायक आहे.
तथापि, तुम्ही किती लवकर व किती उत्तमतऱहेने संघटित व्हाल यावर हे सर्व अवलंबून आहे. तुम्ही संघटित का व्हावे आणि संघटनेद्दारे तुम्ही काय करू शंकाल हे मी तुम्हाला सांगितलेच आहे. आता तुम्हाला एवढेच सांगून मी भाषण संपवितो की, तुमची स्वतःची संघटना उभारण्याच्या कार्यात तुम्ही आता मुळीच विलंब लावता कामा नये. यां परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे निमंत्रण देऊन तुम्ही माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी तुम्हाला सुयश चिंतितो. “ *
१ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : मा. फ. गांजरे खंड-२, पुनर्मुद्रण १०-४-१९८६. पृ. १३२-१४८.