१२-२-१९३८ शील व सौजन्य नसेल तर शिक्षित माणूस हिंस्र पशूपेक्षाही क्रूर व भीतिप्रद - Page 152

११९
शील व सौजन्य नसेल तर शिक्षित माणूस

हिंस्त्र पशुपेक्षाही क्रूर व भीतीप्रद

दिनाक ५ फेब्रुवारी १९३८ च्या जनता ' पत्रात जाहीर केल्याप्रमाणे मनमाड येथे दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी १९३८ ला आयोजित अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषदेच्या भव्य मंडपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इलाखा अस्पृश्य युवक परिषद १२ तारखेला रात्री ८ वाजता घेण्यात आली. या परिषदेत श्री. मुरलीधर पगारे यांच्या भाषणानंतर निरनिराळे ठराव पास झाल्यावर डॉ. आंबेडकरसाहेब यांचे भाषण झाले.

डॉ. बाबासाहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,

आजच्या या युवक परिषदेचा मी युवक नसतानाही मला अध्यक्ष केले आहे. कारण माझ्या वयाची ४० वर्षे उलटून गेली आहेत व सर्वसाधारणपणे युवकांची आयुष्यमर्यादा ४० च्या आत असते. असो. |

आजची ही परिषद जरी युवकांची असली तरी या ठिकाणी सबगोलंकार झाल्याचे आपणास आढळून येईल. कारण या युवकांच्या परिषदेत म्हातारे आहेत तर माझ्या उजव्या बाजूचा सर्व ब्लॉक भगिनींनी गडगच्च भरला आहे. तेव्हा आजच्या युवक परिषदेतील माझे भाषण युवकेतरांना जरा विसंगत वाटेल. तेव्हा मी आज जे बोलणार आहे ते फक्त युवकांना उद्देशूनच बोलणार आहे.

आजची ही युवक परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वसाधारण लोकसंख्येत मोठा भाग तरुणांचा आहे. जी म्हातारी माणसे आहेत ती थोडी असून

त्यापैकी बऱ्याच जणांच्या गोवऱ्या ओम्‌कारेशवरी गेल्या आहेत. त्यांच्या लहानपणापासून ते ज्या परिस्थितीत वाढले आहेत, त्या परिस्थितीतून सुटण्यास त्यांच्यापैकी बरेच जण आज तयार नाहीत. ज्या परिरिथतीत ते वाढले असतील त्या परिस्थितीस चिकटून राहाण्याची त्यांची वृत्ती दिसते. त्यांच्या हातून दुसऱ्या एखाद्या कार्याची आपणास जरी अपेक्षा करता येत नसली तरी आपल्या चळवळीच्या चालत्या गाडीस ते आड न आले तरी त्यांचे आपल्यावर मोठे उपकार होतील.

जनता : २६ फेब्रुवारी १९३८.

प्रस्तुत भाषण १२ तारखेचे असले तरी परिषदेच्या वृत्तांतात खंड पडणे योग्य होणार नाही म्हणून १३ तारखेनंतर देत आहोत.-संपादक.