शील व सौजन्य नसेल तर . . . . . क्रूर व भीतीप्रद ११५
आजची ही युवकांची सभा युवक संघाच्या विद्यमाने व्हावयास पाहिजे होती. परंतु ती आज स्वतंत्र मजूर पक्षाच्या विद्यमाने होत आहे. ही परिषद युवकांनीच भरविली असती तर फार बरे झाले असते. परंतु युवकांच्यात किरकोळ मतभेद आहेत हे जरी खरे असले, नाशिक जिल्हा युवक संघाच्या विद्यमाने ही परिषद भरणार असे जरी पूर्वो जाहीर झाले असले तरी कार्याकडे लक्ष देऊन त्यांनी आपला हेका न धरीता युवकांची परिषद, मग ती कोणातफंही का होईना पण होवो; या उदात्त भावनेने मिळते घेतले ही अत्यंत अभिनंदनीय अशी गोष्ट त्यांनी केली आहे. सार्वजनिक कार्यात काम करू इच्छिणाऱ्यात जर ही भावना नसेल तर त्यांच्या हातून काहीही होऊ शकणार नाही. तेव्हा सार्वजनिक कार्यात पडलेल्यांनी अगर पडू इच्छिणाऱ्यांनी ही भावना सतत मनात बाळगण्यातच समाजहित आहे. युवक संघाच्या मंडळींनी घालून दिलेल्या या स्तुत्य व अनुकरणीय उपक्रमाबद्दल मी पुन्हा त्यांचे अभिनंदन करतो..
युवकांच्या परिषदेत मला जे सांगावयाचे आहे ते मी पुस्तकरूपाने प्रसिद्ध करू इच्छित होतो. तथापि, कामाच्या वाढत्या व्यापामुळे ते आज जरी शक्य झाले नसले तरी मी लवकरच ते सर्व पुस्तक रूपाने प्रसिद्ध करेन. आजच्या प्रसंगी मी फक्त महत्त्वाच्या एकदोन गोष्टी सांगू इच्छितो. माझी चाळीशी उलटून गेली असल्याने मी आता युवक नाही ही कबुली मी दिलीच आहे. मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे, पिणे व जगणे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये. खाणे-पिणे हे जगण्याकरिता असावे व जगणे हे मानमरातबाचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे. ' खाण्याला काळ व भूईला भार “ असे जगणे असले काय नि नसले काय सारखेच. या बाबतीत प्रसिद्ध नाटककार कै. गडकरी यांनी एके ठिकाणी म्हटले आहे फी, ' जोपर्यंत | ` समाज आपली मानमान्यता ठेवतो तोपर्यंतच जगण्यात भूषण आहे ' नाही तर समाजास अप्रिय होऊन अगदी म्हातारा होऊन बिछान्यास खिळून अगर घरातीलं सुनामुलांच्या तिरस्कारास पात्र होऊन झिजून झिजून जगण्यापेक्षा त्या अगोदर आलेले मरण भूषणाचे असते.
मी एकेकाळी तरुण होतो तेव्हा माझ्या अनुभवाच्याच गोष्टी मी आपणास सांगू इच्छितो. तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते. म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे की, ' तपा अंती फळ. कार्य आत्मोन्नतीचे असो वा राष्ट्रोन्नतीचे असो कशाचेही का असेना