आणि माषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ११६
त्या कार्यास स्वतःस त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत. माणसाने
अर्वाचीन तरुण पाहिले आहेत की, जे १५ मिनिटे वाहून घेतले पाहिजे. मी अनेक
टेबलावर सतत बसू शकत नाहीत, त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते. चहा प्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही. हे योग्य नाही. कोणीही इसम आपल्या उपजत बुद्धीवर पराक्रम करू शकत नाही. जगात खुळी माणसे फारच थोडी निपजतात तसेच बुद्धीचा विकास करणे ही दरेकाच्या हातची गोष्ट आहे. २४ तासापेकी २० तास सतल टेबलावर बसून काम करता आले पाहिजे. मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही सतत २० तास टेबलावर बसून काम केले आहे. ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव
वाढवावयाचा आहे त्यांनी तप केले पाहिजे, श्रम केले पाहिजेत.
मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो. आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते. जरका
या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कुचकामाचा ठरतो. हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये. ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल. हरेक तरुणात महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. महत्त्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही. . यासाठी अस्पृश्य मानलेल्या तरुणांमध्ये महत्त्वाकांक्षेचे बी प्रथम रुजले पाहिजे. आज आपण जेथे जेथे जाल मग ती मामलेदार कचेरी असो, कलेक्टरचे ऑफिस असो अगर कोर्ट असो, दर ठिकाणी
या पांढरपेशा भटा-ब्राह्मणांचाच सुळसुळाट झालेला दिसेल. या सर्व परिस्थिती- वरून इतरेजणांना निराश होणे हे जरी स्वाभाविक असले तरी आज आपण निराश
न होता मनात उच्च महत्त्वाकांक्षा धरुन त्या दृष्टीने प्रयत्नांची शिकस्त. करावयास हवी आहे. मला जरी मुंबईचा गव्हर्नर केले तरी ते कमीच होईल
असे मानणारा मी आहे. हे सांगण्याचा मतलब इतकाच की, आपल्यापैकी
दरेकाने उच्च महत्त्वाकांक्षा बाळगून ती फलद्रूप करण्याचा कसोशीने प्रयत्न केला
पाहिजे.
तरुण बंधुंनी आत एक बाहेर एक असली सवय लागू देऊ नये. सत्य सोडू नका. सत्याचा तात्कालिक जरी विजय होत नसला तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. आपल्यात दुटप्पीपणा असता कामा नये. जगाला जर हा मनुष्य दुतोंडी आहे असे दिसले तर मग जग आपल्यावर विशवास
ठेवणार नाही!