१२-२-१९३८ शील व सौजन्य नसेल तर शिक्षित माणूस हिंस्र पशूपेक्षाही क्रूर व भीतिप्रद - Page 155

शील व सौजन्य नसेल तर .... . क्रूर व भीतीप्रद ११७

आज विद्येची द्वारे आपणास मोकळी आहेत. आज शिक्षणाच्या ज्या सवलती

आहेत त्या आमच्या वेळी मुळीच नव्हत्या. आम्हास त्या काळी कोणाचीच मदत नव्हती. मला येथील विश्वविद्यालयात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी, एक बकरी, सरपण, चूल, आठवड्याचा बाजार वगैरे सर्व सामान ८८ च्या लांबी रुंदीच्या खोलीत राहून कॉलेजचा अभ्यास करावा लागत असे. तुमच्या सुदैवाने ही रिथती आज बदलली आहे. साधनांच्या अभावी शिक्षण घेता येत नाही अशी

जर आपण तक्रार केली तर ती निराधार ठरेल.

आपल्यापैकी दरेकाने सुविद्य व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. परंतु त्याच बरोबर आज विद्येची मला मोठी भीती वाटते. शिकलेल्या माणसांची मला जशी भीती वाटते तशी ती सर्वानी बाळंगिली पाहिजे. कारण शिक्षण हो तलवार आहे, ` शिक्षण हे शस्त्र आहे. जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला तर आपण सर्व जण त्यास घाबरून जाल. परंतु विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणाऱ्यावर

अबलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल. चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे

बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो

हिंस्त्र पशुपेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात यावा. अज्ञ जनतेस छक्केपंजे,

डावपेच करता येत नाहीत. शिकल्या सवरलेल्यांना ते अवगत

असतात. एखाद्याचे व्ह्यू असल्यास तेवढेच काढून त्यास कसा पेचात

आणावयाचा याकडे बरेच लोक आपल्या शिक्षणाचा उपयोग करतात. वीनदुबळ्या,

गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही. त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा शिकले

सवरलेले शेठजी, भटजी, वकील वगैरे सर्व लोक घेत आहेत. अशातऱ्हेने गरीब

जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर घि:कार असो

अशा या शिक्षणाला. त्या दृष्टीने पाहता शिक्षणापेक्षा शील फार महत्त्वाचे

आहे. अलिकडील तरुणात धर्माबद्दल औदासिन्य दिसते. धर्म हा गांजा आहे

असे ते म्हणतात. परंतु माझ्यात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील व माझ्या

शिक्षणाचा जो काही जनतेसाठी उपयोग झाला असेल तो सर्व माझ्यात असलेल्या

धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे, परंतु धर्माचे ढोंग नको. हिंदू

धर्म हा नरक आहे ही माझी समजूत अजूनही कायमच आहे. तेव्हा मला तुम्हाला

एवढेच सांगावेसे वाटते की, शिक्षणापेक्षा शीलाला अधिक महत्त्व द्या. तसेच

आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दीनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करिता

जर शिकून आपली नोकरी भली आहे, आपली बायकामुले भली या भावनेने आजचे

शिकलेले तरुण वागणार असले तर त्यांचा समाजाला काच उपयोग ? तरुणांवर