डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ११८
आज पडलेली जबाबदारी ओळखून त्यांनी त्या कार्यास लागावयास हवे आहे. जनतेच्या हाडीमासी भित्रेपणा खिळलेला दिसतो. आपले कायदेशीर हक्क बजावण्यास सुद्धा ते धैर्याने पुढे येऊ शकत नाहीत. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरणे, सार्वजनिक राजरस्त्याने मिरवणुकी नेणे वगैरे लोक भित्रेपणामुळे करू शकत नाहीत, ही परिस्थिती फक्त तरुणच बदलू शकतील. परंतु त्यासाठी प्रथम कंबर कसली पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्राणयज्ञदल संस्था ठिकठिकाणी स्थापन करावयास हव्या आहेत. निसर्गसिद्ध हक्क मिळविण्यासाठी त्यांनी जोराचे लढे लढविले पाहिजेत. याबाबत एक मनोरंजक व बोधप्रद अशी पौराणिक गोष्ट मला आठवली तेवढी सांगून मी माझे भाषण पुरे करणार आहे.
द्रोण हा अत्यत गरीब होता. तो श्रीमंतांच्या आळीत राहत असे. त्याला अश्वत्थामा नावाचा मुलगा होता. त्याच आळीतील श्रीमंतांची मुले सोन्याच्या वाटीतून दूध पीत असत हे अश्वत्थामाने पाहिल्यानंतर तोही या *
“यापुढील भाषण असलेला अंक मिळाला नाही.-संपादक.