२५-२-१९३८ गरिबांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या सरकारने अधिकार त्याग करणेच इष्ट - Page 157

१ २ 0

गरिबांच्या पोटावर पाय ठेवणार्‍या सरकारने
अधिकारत्याग करणेच इष्ट

यंदाच्या बजेट अधिवेशनाला तारीख २५ फेब्रुवारी १९३८ रोजी दुपारी २-०० वाजता ना. मावळणकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरूवात झाली. आजच्या अधिवेशनाला बरीच मंडळी हजर होती. चालू अधिवेशनासाठी पॅनेल ऑफ चेअरमनच्या जागी (१) खान बहादुर अब्दुल्ला लतिफ, (२) स्वतंत्र मजूर पक्षाचे मि. राजाराम आर. भोळे, (३) मि.ब्रॉबल व (४) सर एस. टी. कांबळी यांची नेमणूक केल्याचे ना. स्पीकर यांनी जाहीर केले. प्रथम प्रश्नोत्तरे झाल्यावर असेंब्लीपुढे ना. लठठे यांनी १९३७-३८ सालचे बजेट मांडताना आपले भाषण केले. हे भाषण

जवळजवळ दोन तास चालले होते.

ना. लठ्ठे यांच्या भाषणानंतर शुक्रवारच्या बैठकीचे कामकाज संपले. शनिवार बजेटावरील चर्चेचा दिवस होता. परंतु त्यादिवशी मुस्लीम लीगच्या सभासद

मिसेस सलिमा फैज तय्यबजी यांनी छोटेसे भाषण करून मुसलमान मुलींच्या

शिक्षणाची योग्य तरतूद नवीन अंदाजपत्रकामध्ये केल्याबद्दल ना. फडणिसांचे

अभिनंदन केले. यानंतर श्री. बाबूभाई पटेल यांनी अंदाजपत्रकाचे मामूली

अभिनंदन केल्यानंतर या दिवशी दुसरे कोणीच सभासद बोलायला उभे राहिले

नाहीत. म्हणून असेंब्लीची बैठक मंगळवारपर्यंत तहकूब ठेवण्यात आली

होती. मंगळवारी प्रथम प्रश्‍नोत्तरे झाल्यावर बजेटावरील चर्चेला सुरूवात

झाली. आजच्या बैठकीत श्री. जमनादास मेहता यांचे पहिले भाषण

झाले. बुधवारच्या बैठकीला सुरुवात झाल्यावर २-३० वाजता स्वतंत्र मजूर

पक्षाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सडेतोड व परिणामकारक भाषण

झाले.

डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

मुंबई सरकारच्या नवीन बजेटावर काल परवा जी भाषणे झाली त्यामध्ये या

बजेटाचे अभिनंदन करण्यात आले. परंतु या अभिनंदनात मी भाग घेणे अशक्य

आहे असे खेदाने म्हणावे लागते. बजेटाकडे दृष्टी वळविताच प्रथम दर्शनीच

बजेट निराशाजनक आहे असे वाटते. या अंदाजपत्रकाची अशा रीतीने योजना

केलेली आहे की, श्रीमंतांच्या खिशाला बिलकूल चाट न देता गरिबांना हालअपेष्टेत

gna NR RSS मरत

जनता : ५ मार्च १९३८.