१२० डॉ. चावासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे
बजेटाने भावी सुखकर दिवस काढण्यास भाग पाडले आहे. तसेच या
किंवा आपल्या प्रातास उज्ज्वल परिस्थितीची अंधुकही जाणीव होत नाही
कल्पना होत नाही. पोकळ भविष्यकालाची प्रभात काल सुरू झाल्याचीही
आश्वासनावर या बजेटाची सजावट केलेली आहे. तरी पण या बजेटातील पोलिस फोर्सबद्दल केलेली योजना फक्त काही अंशी अभिनंदनीय आहे. परंतु या योजनेचे श्रेय मी ना. फडणिसांपेक्षा ना. गृहमंत्र्यांनाच देऊ इच्छितो. याच पोलिसांच्या फोर्ससंबंधी विद्यमान अधिकारारूढ काँग्रेस व पूर्वीची काँग्रेस यांचे नाते कसे विसंगत होते याची जाणीव सर्वाना आहेच. मागे काँग्रेसच्या असहकारितेच्या चळवळीच्या काळात पोलिसांविषयी काँग्रेसला इतका आपलेपणा वाटत नव्हता. . असंख्य अशा खादी टोपी घातलेल्या काँग्रेसवाल्यांच्या मुखातून ' पिवळी पगडी हाय हाय ' म्हणून निघणारी मुक्ताफळे ऐकणारांना आज त्याच अधिकारारूढ काँग्रेसला जादा ३६ हजार रुपयांची तरतूद याच पोलिस फोर्सकरिता करण्याची पाळी यावी ही जितकी अभिनंदनाची तितकीच आश्चर्याची गोष्ट होय. सध्याचे मुंबई सरकार असेंब्लीच्या अधिकाराचे अतिक्रमण करीत | आहे असे वाटते. अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने आपल्याच अधिकारात
अंदाजपत्रकातील खर्चाच्या बाबतीत मोठ्याशा रकमा जमेला धरल्या नव्हत्या. तसेच या बाबतीत सरकारने प्रथम या खर्चाच्या योजनेसंबंधी असेंब्लीला आगाऊ जाणीव करून द्यायला पाहिजे होती. दुसरे असे की, अकाऊंटंट जनरलला ही रककम कशारीतीने उपयोगात यावयाची आहे याची
कल्पना द्यायला पाहिजे होती. परंतु या सर्व गोष्टींकडे सत्तेच्या बळावर दुर्लक्ष करून मुंबई सरकार आज आपल्या कल्पनेच्या बळावर किंबहुना हवेतील बंगले बांधायच्या योजनेसाठी एकदम ३६ लाख रुपयांची रक्कम जमा करीत आहे. या बाबतीत असेंब्लीचे मत घेतलेले नाहीच आणि आपण विधायक असे कोणते कार्य करणार आहोत याचीही अंधुक कल्पना दिलेली नाही. तसेच या गृहाचे जे
कायदे मंजूर करण्यात येतात त्या कायद्याखाली नियम करण्याचा या गृहाचा काहीच हक्क नाही असे ना. गृहमंत्र्यांचे प्रामाणिक मत आहे असे वाटते. ते आज यावेळी गैरहजर असल्यामुळे त्याच्यासंबंधी खुलासा मिळणे शक्य जरी नसले
तरी या ना. गृहमंत्र्यांच्या सत्तेच्या दुरुपयोगाबद्दल मला येथे स्पष्टपणे इशारा देणे भाग पडत आहे.
नवीन लोकोपयोगी कामाची तरतूद करण्यासाठी सरकारने यासाठी १ कोटी १६ लक्ष रुपयाची योजना केल्याचे सांगण्यात येते. परंतु या सर्व आकड्यांची छाननी केली तर आपणास काय दिसून येईल ? या प्रचंड रकमेतून दरवर्षी