२५-२-१९३८ गरिबांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या सरकारने अधिकार त्याग करणेच इष्ट - Page 159

गरिबांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या . . . . करणेच ड्प्ट १२१

` होणाऱ्या खर्चापैकी ४८ लक्ष ११ हजार रुपये व दारूबंदीच्या खर्चासाठी ३१ लक्ष

रुपये राखून ठेवलेले आहेत. ते वजा केले म्हणजे या लोकोपयोगी कामासाठी

३७ लक्षच रुपये खरे जमेला धरलेले दिसून येतील. त्याप्रमाणे शिक्षण,

पाणीपुरवठा, वैद्यकीय मदत वगैरेसाठी खर्च होणारी रक्‍कम परत मिळणे अशक्य

असते किंवा त्या खाती खर्च केलेल्या रकमेतून उत्पन्न मिळणे अशक्य

असते. तसेच प्रांतातील बेकारी निवारण, आजारीपणाचा विमा, म्हातारपणासाठी

विमा, अपघाताचा विमा, स्त्रियांच्या बाळंतपणासाठी मदत वगैरे अनेक आवश्यक

अशी लोकोपयोगी कार्य करण्याची आवश्यकता आहे. परंतु या बाबतीत मुंबई सरकारने शुद्ध मुग्धता स्वीकारलेली दिसते. आज वरील लोकोपयोगी

कार्यासाठी जी रक्कम जमेस धरली आहे ती पुढीलवर्षी धरणे कठीण होईल, असे

वाटते |

कामगारांच्या हितसंबंधाचे धोरण गेल्या ऑगस्ट महिन्यात याच अधिकारारूढ

सरकारने कामगारांचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी जे धोरण आखल्याचे जाहीर

केले होते त्या योजनेनुसार या प्रांताला खर्च किती होईल याचा अंदाज

ना. गृहमंत्र्यांनी दिला असता तर फार बरे झाले असते.

` आपल्या प्रांताच्या लोकोपयोगी योजनेसाठी ना. फडणिसांची योजना थोडा वेळ

दृष्टिआड ठेविल्यास माझ्या अल्पमतीप्रमाणे या योजनेला कमीत कमी २४ कोटी

रुपये खर्च येईल. इतका खर्च करण्याची ज्या सरकारच्या अंगी धमक आहे तेच

सरकार त्या प्रांताचा राज्यकारभार चालविण्यास लायक आहे, असे माझे मत आहे. परंतु इतकी रक्कम उभी करण्यासाठी आमचे प्रांतिक सरकार प्रयत्न

करील काय ? इतर पाश्‍चिमात्य देशातील सरकार प्रत्येक माणसी किती किती

खर्च करू शकते याचे प्रमाण असे दिसून येईल की, कॅनडा ९ पौंड व ८ शिलींग

साऊथ ऑस्ट्रेलिया १९ पौंड, न्युझिलंड २२ पौंड, आयरीश फ्रीस्टेट १० पौंड आणि

मुंबईमध्ये ७ पेन्स पडतात. हे प्रमाण पाहिल्यावर आपल्या भिकार आर्थिक

परिस्थितीचे चित्र किती भेसूर आहे याची चांगलीच कल्पना होते. आपल्या [प्रांताच्या ] उत्पन्नाचा तपशील पाहिला असता पूर्ण निराशा होते. गेल्या १९२२ ते १९३५ सालात मुंबई प्रांतापेक्षा इतर प्रांतांची पुढीलप्रमाणे उत्पन्नाची वाढ झाली

आहे. मद्रासमध्ये २६.५ टक्के, पंजाब २८ टक्के, संयुक्त [प्रांत ] १६.५ टक्के, आसाम १४.५ टक्के, बंगाल ११.५ टक्के आणि [मुंबईमध्ये ] [अवधे ] [३ ] टक्के. या गेल्या १३-१४ वर्षात जादा कराच्या आकारणीने मिळालेले [उत्पन्न ] जमेला धरले नाही तर मुंबईचे उत्पन्न ५.५ टक्के घटलेलेच दिसेल. अशा परिस्थितीत आपल्या सरकारने दारूबंदीची चळवळ हाती घेऊन उत्पन्नाच्या बाबीच्या दृष्टीने बुडत्याचा पाय खोलात अशी [वृत्ती ] [स्वीकारली ] [आहे ] [आणि ] [ही ] योजना अंमलात आणताना दुसऱ्या कोणत्याही उत्पन्नाची रक्कम जमेस न धरता