२५-२-१९३८ गरिबांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या सरकारने अधिकार त्याग करणेच इष्ट - Page 160

आणि भाषणे डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन १२२

आहे. सारा सूट देऊ नये उलट लॅन्ड रेव्हेन्यू कमी करण्याचे धोरण आखलेले

असा आहे की, दारूबंदी व सारा सूट असे माझे म्हणणे नाही. माझा कटाक्ष

करणे या दोन योजना हाती घेतल्यावर, या योजनेमुळे सरकारी तिजोरी रिकामी होईल, तिची भर करण्यासाठी काही विधायक योजना ना. फडणिसांनी केलेली आहे काय ?

गेल्या अंदाजपत्रकाच्यावेळी ना. फडणिसांनी आपल्या भाषणात जी आशायुक्त वचने दिली होती त्याचे वाचन केल्यावर आपणास आजच्या बजेटाच्या वेळी काय दिसून येत आहे ? त्यावेळी कबूल केलेल्या वचनांचा या नवीन बजेटात उल्लेख तर नाहीच उलट त्या बजेटाच्या वेळी बहुजन समाजाच्या हितसंबंधांच्या प्रश्‍नासंबंधी त्याने जे धैर्य दाखविले होते त्याचा या नवीन बजेटात बिलकूल मागमूस दिसत नाही. या बजेटात नवीन कर नाहीत म्हणून हे बजेट चांगले अशी जी स्तुतिस्तोत्रे गाईली जातात त्याचेच मला मोठे आश्चर्य वाटते. नवीन कर न बसविल्यामुळे श्रीमंतांच्या वरील खर्चाचे ओझे कमी केल्यामुळे गरिबांना

हालअपेष्टा सोसाव्या लागणार याचा गरिबांची पाठीराखी म्हणविणाऱ्या काँग्रेसच्या या अधिकारारूढ मंत्रिमंडळाने चुकून तरी विचार केला आहे काय ? म्हणूनच मी

स्पष्टपणे असे म्हणतो की, हे नवीन बजेट गरिबांचे नसून श्रीमंतांचे आहे यात तिळमात्र शंका नाही. खरे पाहिले असता कोणत्याही सरकारची मदत गरिबांना हवी. गरिबांसाठी झटणारे सरकार आपणास हवे. ज्या श्रीमंतांना

वैयक्तिकरीत्या वाटेल त्या सुखसोयी आपल्या मुला-बाळांना व बाया-बापड्यांना

देता येतील त्यांनाच एखादे सरकार अशा आणीबाणीच्या वेळी मदत करावयास

तयार होणे हास्यास्पद नाही असे म्हणता येणार नाही. अशा रीतीने गरिबांच्या पोटावर पाय ठेविणारे सरकार अधिकारारूढ होण्यापेक्षा त्याने शक्‍य ते लवकर

अधिकारत्याग करणेच इष्ट असे मला वाटते,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण फारच परिणामकारक असे झाले. त्यांच्याइतके उत्कृष्ट, परिणामकारक, मुद्देशीर आणि अधिकारयुक्त असे भाषण आजपर्यंत मुंबई कायदेमंडळात झाले नव्हते असे सांगण्यात येते आणि आमचीही त्या बाबतीत खात्री पटते.

ना. लठ्ठे यांनी उत्तरादाखल केलेले भाषण विशेष समाधानकारक नव्हते. त्यांनी फक्त अर्ध्या तासात भाषण केले. त्यावरून त्यांना आपल्या विरोधकांना सरळ व मुद्देसूद उत्तर देणे किती अवघड झाले होते याची खात्री पटते. त्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस आपण सर्व वर्गाच्या जनतेच्या हितसंबंधांकडे विशेष लक्ष देऊन प्रामाणिकपणे कार्य करीत असल्याचे सांगितले.

७ ७ ७