१२१
गुन्हेगार आरोपीला दिलेली शिक्षा तहकूब करणे
म्हणजे कायद्याचे उच्छेदनच
जाधवजी गांधी व धीरजलाल या दोघा धनवंत परंतु अट्टल सटोडियांना मुंबई
हायकोर्टाने जुगारीच्या आरोपावरून दिलेल्या कैदेच्या शिक्षा आपल्या अधिकारात तहकूब करून लोकशक्ती सर्क्युलर प्रकरणात मिळविलेल्या कुप्रसिद्धीवर कळस चढविणारी अशी न्यायदानाच्या कामात अक्षम्य ढवळाढवळ केली, याबद्दल मुंबई सरकारचे गृह मंत्री ना. मुन्शी यांच्याविरुद्ध निंदाव्यंजक अशी कामकाज
तहकुबीची सूचना बॅ. जमनादास मेहता यांनी गेल्या सोमवारी मुंबई लेजिस्लेटिव्ह
असेंब्लीत आणली होती.
या सुचनेच्या समर्थनार्थ स्वतःच बॅ. जमनादास मेहता व विख्यात कायदेपंडित आणि असेंब्लीतील स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते बॅ. भी. रा. उफ बाबासाहेब आंबेडकर
यांनी विस्तृत भाषणे केली.
डॉ. आंबेडकर आपल्या दि. ७ मार्च १९३८ च्या भाषणात म्हणाले,
अध्यक्ष महाराज, मी या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी उभा राहिलो आहे. चर्चेच्या अखेरीला हया ठरावावर मी बोलत असल्यामुळे आणि ना. गृहमंत्र्यांना उत्तर देण्यासाठी अवकाश मिळाला पाहिजे याची जाणीव असल्याने मला जे काही येथे सांगावयाचे आहे, ते अगदी थोडक्यात सांगतो.
स्वतःपुरतेच बोलावयाचे तर पहिली जी गोष्ट मला सांगावीशी वाटते ती ही की हा निंदाव्यंजक ठराव ज्या कृत्यामुळे आणला गेला आहे, ते कृत्य घडून यावे । यात मला कसलाच विस्मय वाटत नाही.
` चालू सरकारने अधिकार ग्रहण केल्यापासून कायदेभंगाच्या सदरात निःसंशय घालता येतील अशी जी अनेक कृत्ये हे सरकार करीत आले आहे, त्यांचा हे कृत्य म्हणजे कळसच होय, असे मी समजतो.
तथापि, हा झाला तरी या साऱ्या कृत्यांपैकी एक भाग आहे, चालू असलेल्या नाटकाचा एक अंक आहे, त्याचा शेवट कधी होईल, काही कळत नाही. त्यापैकी पहिले कृत्य सांगावयाचे म्हणजे ते अर्थातच बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या जप्त करण्यात आलेल्या जमिनी त्यांना पुन्हा मिळवून देण्याची सरकारने जी जोखीम अंगावर घेतली आहे, ते सांगता येईल. (एक सभासद मध्येच उदून बोलण्याचा प्रयत्न करतात.) माझा वेळ थोडा आहे, तेव्हा माझे भाषण नीटपणे
ऐकून घेतले जावे, अशी मी विनंती करतो. SND va NN lS
विविधवृत्त : १३ मार्च १९३८.