डॉ. बावाराहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे १२४
बसतील काय ? नामदार सभासद खाली अध्यक्ष - ऑर्डर, ऑर्डर,
चर्चा चालू ठेवल्यास तिचे क्षेत्र अमर्याद वाढत (डॉ. आंबेडकर याना) हया तऱ्हेने
गत कूत्याबाबत ते दोषाला पात्र राहील. अशी मला भीती वाटते. सरकारच्या
आहे किंवा नाही हा काही प्रस्तुतचा मुद्दा नाही, तर प्रस्तुत ठरावाचा विषय असलेले विशिष्ट कृत्य निषेधार्ह आहे किंवा नाही हाच वादाचा मुद्दा आहे. तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या ठरीव बाबींशी या ठरावाचा संबंध आहे आणि हा जो ठरीवपणा ठरावाला परवानगी मिळण्यास कारणीभूत झाला आहे, तो वादातही राखणे अवश्य आहे. म्हणून सभेपुढे असलेल्या ठरीव बाबींपुरतेच बोलण्याची
नामदार सभासदांना मी विनंती करतो.
डॉ. आंबेडकर.- महाराज, मी आपल्यापुढे याबाबत हा मुद्दा मांडण्याची परवानगी घेतो की, तुलना करण्याकरिता एखाद्या गोष्टीचा निर्देश करणे आणि तिची युक्ता-युक्तता ठरविण्याच्या दृष्टीने तिचा खल करण्यासाठी तिचा निर्देश करणे या दोहोत फरक आहे. बार्डोलीच्या जप्त जमिनी परत करण्याबद्दलच्या युक्ता-युक्ततेवाबत मी चर्चा केली असती, तर आपला निर्णय मला खचित लागू झाला असता. तेव्हा सरकारच्या गत-कृत्यांचा कळस प्रस्तुतच्या कृत्याने
झाला आहे, असे म्हटल्याने अथवा त्या कृत्यांपेकी एखाद्या कृत्याचा, त्याच्या युक्ता-युक्ततेबद्दलच्या वादात न शिरता निर्देश केल्याने मी नियमभंग केला, असे
होत नाही.
अध्यक्ष.- ठरीव बाबीबद्दलचा प्रश्न सभेपुढे आहे. इतर गोष्टींचा निर्देश
केल्यास दुसरे विषय चर्चेत उद्भवतील म्हणून स्थूलपणे देखील इतर
विषयांबद्दलचा निर्देश करण्यास मुभा देणे, मला योग्य वाटत नाही.
डॉ. आंबेडकर.- असे असल्यास मला सभेपुढे असलेल्या विषयापुरतेच बोलणे
भाग आहे. तेव्हा सभेपुढे असलेल्या हया विषयासंबंधी मला जे सांगावयाचे आहे
ते हे की, प्रथमतः हया खटल्यासंबंधीच्या साऱया गोष्टी आपल्याला माहीत झालेल्या
नाहीत. जे काही माहीत झाले आहे, ते केवळ वृत्तपत्रांवरूनच होय. ठरीव असा पुरावा आपल्यापुढे नाही आणि मला असे कळते की, हया खटल्याच्या सत्य
गोष्टी काय आहेत त्या साऱ्या सभेपुढे ठेवण्याची ना. गृहमंत्र्यांना विनंती करण्यात आली होती पण त्यांनी तसे कलेले नाही, यामुळे मला व त्याचप्रमाणे सभेतील इतर सभासदांनाही ही मोठीच अडचण सोसावी लागत आहे. कदाचित ह्या सत्य गोष्टी ज्या वेळी अखेरीला उजेडात येतील, त्यावेळी प्रस्तुतची ही चर्चाही अनावश्यक अथवा अकालिक होती, असेही आढळून येईल. पण ही चर्चा अनावश्यक ठरल्याचे दिसून आलेच, तर त्याचा दोष सर्वस्वी गृहमंत्र्यांच्याच शिरावर पडेल यात किमपिही संदेह नाही, कारण सभेला आपल्या विश्वासात