१९-३-१९३८ सत्याग्रहाच्या यशाचे फळ माझ्या एकट्याचेच नाही तर आपणा सर्वाचे - Page 166

१२२

सत्याग्रहाच्या यशाचे फळ माझ्या एकट्याचेच नाही

तर आपणा सर्वाचे

दिनांक १९ मार्च १९३८ रोजी सोमवंशीय हितकारी समाज आणि ताडवाडी येथील अखिल अस्पृश्य रहिवाशांच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. पी. जी. सोळंकी यांना मानपत्र व थैली अर्पण समारंभ आयोजित केला होता.

उपरोक्त समाजाच्या विद्यमाने महाड सत्याग्रहाच्या अकराव्या. स्मृतिदिनाचे शुभप्रसंगी, अस्पृश्य वर्गाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. पी. जी. सोळंकी यांना त्यांच्या सर्वश्रेष्ठ आणि बहुमोल कामगिरीबद्दल मानपत्र व थैली देऊन अभिनंदन करण्याचा जंगी जाहीर समारंभ, शनिवार ता. १९ मार्च १९३८ रोजी सुप्रसिद्ध ' विविधवृत्त ' साप्ताहिकाचे विद्वान संपादक मे. रा. का. तटणीस यांच्या अध्यक्षतेखाली उत्तमप्रकारे पार पडला. सभास्थान रंगीबेरंगी लतापताकांनी आणि फुलांच्या तोरणांनी शृंगारण्यात आले होते. आज महाड स्मृतिदिन असल्याने येथील कार्यकर्त्या भंडळींनी त्यानिमित्त समारंभापूर्वी झेंडा- वंदन करून सोमवंशीय हितकारी समाजाचे चेअरमन श्री. रामभाऊ रावजी बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिदिन साजरा केला. प्रथमत: श्री. करंदीकरांनी महाड सत्याग्रहाविषयी सविस्तर माहिती सांगितली., त्यानंतर श्री. मिठगावकर व श्री. डोळस वगैरे वक्त्यांची याच विषयावर भाषणे होऊन नंतर रात्रौ ९.३०

वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.

उच्चासनावर मुंबई लेजिस्लेटीव्ह असेंब्लीचे भाई चित्रे, भाऊराव गायकवाड, डी. जी. जाधव, खंडेराव सावंत, भातनकर, इत्यादी आमदार, अँ.तळपदे, स्वतंत्र मजूर पक्षाचे सेक्रेटरीद्वय श्री. कमलाकांत चित्रे व एस. ए. उपशाम, नायगाव सेवामंडळाच्या मिस. चॉइल्डबाई, आर. सी. ए. मिशनच्या मिस डेसूरबाई व त्यांच्या सहकारीबाई तसेच अनेक संस्थांचे आणि अस्पृश्यवर्गीय कार्यकर्ते

प्रामुख्याने हजर होते. डॉ. बाबासाहेब सभास्थानी येताच बँड वादनात समता सैनिक दलाने त्यांना लष्करी थाटात सलामी दिली. त्यांच्या आगमनाबरोबर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने आणि जयघोषाने सभोवारचे वातावरण निनादित

झाले.

प्रारंभी सामाजिक पदे व पोवाडे झाल्यावर श्री. करंदीकर यांनी अध्यक्षांची थोडक्यात ओळख करून दिल्यावर त्यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. तिला श्री. आर. आर. ढसाळ यांनी अनुमोदन दिल्यावर, अध्यक्ष

जनता : ९ एप्रिल १९३८.