सत्याग्रहाच्या यशाचे . . . . . नाही तर आपणा सर्वांचे १२९
टाळ्यांच्या गजरात स्थानापन्न झाले. त्यांनी समारंभास आलेले भास्करराव
जाधवादि थोर पुढाऱ्यांचे संदेश वाचून दाखविले. तसेच डॉ. पी. जी. सोळंकी
हे प्रकृति अस्वास्थामुळे आपणाला मानपत्र स्वीकारण्यासाठी हजर राहता येत
नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे त्यांचे पत्र वाचून दाखविण्यात
आले. गायन मास्तर भामाजी यांच्या मेळ्यातील मुला-मुलींचे स्वागतपर पद्य
गायन झाल्यावर, श्री. वि. का. उपशाम यांनी डॉ. पी. जी. सोळंकीसाहेब येऊ
शकले नाहीत याबद्दल अत्यंत खेद प्रदर्शित करून नंतर डॉ. बाबासाहेबांचे मानपत्र
वाचून दाखविले. त्यानंतर आमदार भाऊराव गायकवाड यांचे भाषण
झाले. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेबांची कामगिरी सर्वश्रेष्ठ आणि
अवर्णनीय असल्याचे योग्य शब्दात सांगून स्वतंत्र मजूर पक्षाच्या संघटनेवर भर
दिला. त्यानंतर अँ. तळपदे यांनी डॉ. साहेबांच्या विषयी गुण गौरवपर भाषण
केले आणि काँग्रेसच्या पक्षपाती कारवायांचे वर्णन करून स्वतंत्र मजूर पक्षाच्या
असेंब्लीतील कामगिरीबद्दल धन्यवाद दिले. त्यावर भाई चित्रे यांनी आपल्या
भाषणात महाड चवदार तळ्यावर आत्मोद्धारक बळवळीची मूहूर्तमेढ कशी रोवली
गेली आणि आज तीच चळवळ अखिल गांजलेल्या शेतकरी-कामकरी वर्गाच्या,
वर्गलढ्याच्या तत्त्वावर स्वतंत्र मजूर पक्षाचे रूपाने कशी संघटित आणि
जोरदारपणे चालली आहे याचे मुद्देसूद विवेचन करुन आमच्या स्वातंत्र्य युद्धात
आम्हास कोणतीच पाशवी शक्ती प्रतिकार करू शकणार नाही, आम्ही अहिंसेची
बेगडी जपमाळ ओढत बसून पोटभर मार न खाता, आता आमच्या आड
येणाऱ्या हितशत्रूंना पोटभर मार देणार असे छातीठोकपणे सांगून आपले
भाषण संपविले. त्यानंतर अध्यक्षांचे हस्ते श्री. गजोबा दगडूजी दूधावडे यांनी
डॉ. बाबासाहेबांना चांदीच्या कास्केटमधून ' मानपत्र व १०१ रु. ची थैली ' अर्पण
केली. हारतुरे घातल्यावर टाळ्यांचा गजर व जयघोष करून श्रोत्यांनी त्यांचा
गौरव केला. त्यानंतर अध्यक्षांच्या आज्ञेवरून डॉ. पी. जी. सोळंकी यांचे मानपत्र श्री. वि. ल. डोळस यांनी वाचून दाखविले. डॉ. सोळंकी यांचे मानपत्र व
१०१ रु. ची थैली त्यांना. अर्पण करण्यासाठी, अध्यक्षांनी आपल्या हस्ते
मेसर्स दुधावडे, बोरीकर, उपशाम, डोळस, करंदीकर व संस्थेचे सेक्रेटरी
श्री. भवार इत्यादि कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब
टाळ्यांच्या गजरात बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले,
बंधु, भगिनींनो,
तुम्ही माझे भाषण ऐकण्याला आतुर झाला आहात. परंतु मी आज जास्त
बोलू शकणार नाही, कारण प्रकृती स्वास्थ्यासाठी मी आज उपास केलेला
आहे. . शनिवार म्हणून माझा उपास नाही. माझा देवाधर्मावर बिलकूल विश्वास नाही. देवाधर्माच्या या खुळचट व वेडगळ कल्पनांविषयी एकदा मी
त