१९-३-१९३८ सत्याग्रहाच्या यशाचे फळ माझ्या एकट्याचेच नाही तर आपणा सर्वाचे - Page 168

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे १३०

त्यानाती सांगता पिडीविषयी माहिती विचारली. माझ्या हिंदू मित्रांना शकराच्या

आहे ? येथे त्याचे जास्त स्पष्टीकरण आली नाही. शंकराची पिंडी काय

सांगायचे म्हणजे ते निव्वळ सभागदृश्य करता येत नाही. थोडक्यात

षोडशोपचारे पूजा करावी. त्याशी आहे. त्याची धर्मश्रद्धानू प्राण्यांनी खुशाल

आपणाला काही एक कर्तव्य नाही. सांगावयाचा हेतू हा की, माझा उपास तशाप्रकारचा नाही. माझा उपास आज दुपारी सुरू होऊन तब्बल दोन दिवस दोन रात्री उपास धरून मी सोमवारी दुपारी अन्नप्राशन करितो. या दोन दिवसात मी पाणीदेखील पीत नाही. इतका हा खडतर उपास आहे. दुसरे लोक नवस-सायासानिमित्त उपास करतात. पण मला अपचनाच्या विकारामुळे डॉक्टरने आठवड्यातून दोन दिवस उपाशी राहावयास लावले आहे. शरीर

स्वास्थ्यासाठी मला हा उपास करावा लागत आहे व अशा परिस्थितीत मी जास्त बोलू शकणार नाही. आज मला जे हे मानपत्र व थैली दिली आहे त्याबद्दल मी येथल्या मंडळीचा अत्यंत ऋणी आहे. दुसरे असे की, आजचे मानपत्र काही

कोरडे नाही तर त्याबरोबर एक, थैलीही आहे. मानपत्राचा आनंदाने स्वीकार

करून सदर थैली स्वतंत्र मजूर पक्षास देणगीदाखल दिल्याचे जाहीर करितो.

या मानपत्रात, अस्पृश्य वर्गाच्या आतापर्यंतच्या चळवळीचे योग्य शब्दात

दिग्दर्शन केल्याबद्दल मला अत्यंत समाधान होत आहे. माझ्या कामगिरीचे जे

अलंकारिक वर्णन केले आहे ते माझ्या एकट्याच्याच श्रमाचे फळ नसून त्याला

तुम्हा सर्वाचेच अविश्रांत परिश्रम कारणीभूत झालेले आहेत. त्यातल्यात्यात ज्या

दोन महत्वाच्या गोष्टींमुळे आपली चळवळ जगाच्या निदर्शनास आली आणि

यशोगिरीचा टप्पा गाठू शकली त्या दोन गोष्टी म्हणजे ' महाडचा चवदार

तळ्याचा सत्याग्रह व दुसरा नाशिकचा मंदीर-प्रवेश सत्याग्रह. ' या दोन्ही

प्रसंगी माझे मित्र अनुक्रमे भाई चित्रे व भाऊराव गायकवाड यांची धडाडी

आणि अनेकविध संकटांना तोंड देऊन काम करण्याची चिकाटीच कारणीभूत

झाली आहे.