सर्वानी प्रथम भारतीय, . . . . भूमिका घ्यावी १३७
विभक्तीकरण करण्यास केव्हाही मान्यता द्यावयास तयार नाही. तसेच विजापूर व वल्लारी यासारखे दुष्काळी जिल्हे आ पसरून समोर उभे असता, प्रांताच्या जमाखर्चाची तुम्ही कशी काय तोंडमिळवणी करणार ? आमच्या समाजाला या प्रांतात फक्त दोनच जागा आहेत. येथील असेंब्लीत आमच्या इतर प्रतिनिधींमुळे त्यांना पाठिबा आहे परंतु या विभक्तीकरणाने त्यांची वरिष्ठ वर्ग कुचंबणा केल्याशिवाय रहाणार नाही. मी कोणत्याही प्रकारचा प्रांतभेद, इतकेच नव्हे तर महाराष्ट्रीय म्हणूनही घेण्यास भूषण मानीत नाही. तसेच भाषा, प्रांतभेद, संस्कृती वगैरे भेदभाव मी कधीच पाळू इच्छित नाही. प्रथम हिंदी नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्त्व मला पटत नाही. सर्वानी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय, भारतीय पलिकडे काही नको हीच भूमिका घ्यावी, हीच वृत्ती खऱ्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला परिपोषक आहे. म्हणून मी या ठरावाला कसून विरोध करतो.