५२९
निवडून दिलेली माणसे आपले कर्तव्य
करतात की नाही यावर पाळत ठेवा
नागपूर मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मंगळवार, तारीख १० मे
१९३८ ला सकाळी मेलने आले. ते एका क्रिमिनल खटल्याच्या निमित्ताने आले
होते. ते नागपूरात आले हे कोणालाही पाहिल्याशिवाय खरे वाटेना. कित्येकांनी
गिरण्यातून रजा काढून स्वनेत्रानी त्यांना बघितल्यावर खात्री केली व अशारितीने
जनसमुदाय त्यांच्या दर्शनाकरिता हजारोंनी जमू लागला. आज कचेरीचे काम
नसल्यामुळे थोडा विचारविनिमय करण्यास थोडी संधी मिळाली. तिचा फायदा
घेऊन आपल्या दर्शनाचा लाभ करून देण्याकरिता रात्रीच्या वेळी आपला अर्धा
तास देण्याची त्यांना विनंती करण्यात आली. स्वतंत्र मजूर पक्ष, नागपूर नगर
आणि समता सैनिक दल वगैरे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संस्थांनी
इंदोरा येथे ताबडतोब जाहीर सत्कार करण्याची व्यवस्था केली, समारंभाच्यावेळी
जोराचा वारा, जोराचा पाऊस व विजेचा कडकडाट असताना देखील
बाबासाहेबांच्या दर्शनास लोकसमुदायाचे थवेच्या थवे जमू लागले. सत्यप्रसारक
जलसा मंडळ, इंदोरा यांच्यातर्फे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले. समता
सैनिक दलाचे सैनिक आपल्या गणवेषात हजर झाले. या सभेला निदान वीस
हजारावर स्त्री-पुरुष, आबालवृद्ध जमले व बाबासाहेबांच्या आगमनाची उत्कंठतेने वाट पाहू लागले. तोच रात्री साडेनऊ वाजता डॉक्टरसाहेबांची मोटार येताच सैनिकांतफे प्रथम बँडची सलामी व गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. बाबासाहेब व्यासपीठावर विराजमान होताच टाळ्यांचा कडकडाट व त्यांच्या नावाच्या जयघोषाने सर्व पटांगण दुमदुमून गेले. तेव्हा व्यासपीठावर येऊन श्री. आर. आर. पाटील, सेक्रेटरी, मध्यप्रांत आणि वऱ्हाड दलित फेडरेशन यांनी जमलेल्या लोकसमुदायाला उद्देशून म्हटले, “ बंधु भगिनींनो ज्या देवाची एक तासापासून मोठ्या उत्कठतेने वाट पहात आहा, तो देव आपल्या सर्वाच्यासमोर विराजमान झाला आहे. त्यांना हार अर्पण करण्यास आपण उत्सुक झाला आहात. मी ज्यांची नावे सूचवीन त्या अनुक्रमाने आपण येऊन बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करा. “ स्वतंत्र मजूर पक्ष, नागपूर नगर दलित
जनता : १४ आणि २१ मे, १९३८.