१४-५-१९३८ न्याय हक्कांसाठी तरुणांनी मरणही पत्करले पाहिजे - Page 187

न्याय्य हक्कांसाठी तरुणांनी . . . . पत्करले पाहिजे १४९

येथे भरली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्फूर्तिदायक भाषण केले

ते अस्पृश्यांच्या अंगी नवचैतन्य उत्पन्न केल्याशिवाय राहिले नाही.

प्रथम डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला एक दिवस येण्यास उशीर झाल्याबद्दल खुलासा करून सर्वांना एक दिवस तिष्ठत राहावे लागले याबद्दल खेद व्यक्त

केला. नंतर ते म्हणाले, |

या ठिकाणी मला निराळ्यातऱ्हेचे भाषण करावे लागणार आहे. ते असे की ज्या दिवसापासून मुंबईत इंग्रजांचा पाय पडला त्या दिवसापासून आपल्या महार समाजाला नशीब काढायला वाव मिळाला. इंग्रजांच्या राज्यामुळे आपल्याला नशीब काढण्याचा मार्ग मोकळा झाला. इंग्रज परदेशातून आले. त्यांच्याजवळ सैन्य शिपाई नव्हते व सैन्य उभे केल्याशिवाय राज्य मिळण्याची आशा ` नव्हती. पेशव्यांच्या राज्यात वरच्या वर्गाना मोठेपणा व सुखसंपत्ती मिळू शकत असल्यामुळे इंग्रजांच्या सैन्यात वरचा वर्ग जात नव्हता. अस्पृश्यादी पददलित वर्गाला पेशवाईत अगदी अमानुषपणे वागविले जात होते. मनुष्य म्हणून जगण्याचा त्यांना जणू काय हक्कच नव्हता. शूराची जात असून पददलितपणामुळे त्यांचे चीज पेशवाईत झाले नाही. इंग्रजांच्या सैन्य भरतीमध्ये शिरण्याशिवाय

महार, मांग व चांभारांना गत्यंतर नव्हते.

हिंदुस्थानात इंग्रजांनी राज्य कमावले ते महार-मांग-चांभारादी अस्पृश्य वर्गीय शूर सैनिकांच्याच मदतीने. त्याला इतिहासाची साक्ष पटवून द्यायची म्हणजे कोरेगावला जो मनोरा बांधला आहे त्यावरून. कळून येईल. नाहीतर इंग्रजांना या देशाचे राज्य कधीच मिळाले नसते. त्याचा परिणाम चांगला की वाइट हे

आपणाला माहीत आहेच. पेशवाईच्या काळातील अशी गोष्ट सांगण्यात येते की

महारांना राजरोसपणे रस्त्यातून फिरण्याची मुळीच मोकळीक नव्हती. एखादा

महार रस्त्यावर थुंकला व त्यावर एखाद्या ब्राह्मणाचा पाय पडल्यास तो विटाळतो,

त्याला पुन्हा स्नान करावे लागते. यासाठी महाराच्या गळ्यात मडके बांधीत

असत. महार ओळखता यावा म्हणून त्याच्या हाताला काळा दोरा बांधावा लागत

असे. कुत्र्या-मांजराइतकीसुद्धा किंमत महाराला नव्हती. परतु इंग्रजांच्या

सैन्यभरतीमुळे महारांच्या परिस्थितीत बदल झाला. त्यांना माणुसकीने वागविले

जाते याचा अनुभव मिळाला. अशा इंग्रजांच्या राज्याच्या पहिल्या आमदानीत

शे-सव्वाशे सुभेदार, त्याहुन कितीतरी जास्त जमादार-हवालदार होऊन

गेले. पूर्वी गावातील मराठा ज्यांची सावली घेत नव्हता तोच सैन्यात दाखल

झाल्यावर त्याच्याच गावच्या महार सुभेदाराला त्याला सलाम करावा लागत

होता. हा सारा इतिहास आपल्या फुशारकीकरता किंवा बडेजावाकरता मी

सांगत नाही. १८९६ साली इंग्रज सरकारने महार लोकांची सैन्यात भरती करणे

=