१५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
बंद केले. त्यामुळे हुद्यावर जाण्याची बंदी झाली. ज्या इंग्रज सरकारकरिता भात शिजवून देऊन पेज आपण खाल्ली, आपले रक्त सांडले त्यांनीच आम्हाला बंदी का केली, असा प्रश्न उभा राहतो. परंतु यात इंग्रजांचा काही दोष नसून तुमचा-आमचा आहे. महार जात ही अत्यंत दलित जात. या जातीला कोणत्याच प्रकारचा मानसन्मान नाही. अशाप्रकारचा इसम इंग्रज सरकारच्या अधिकारावर चढल्यास मराठा, क्षत्रिय अशा वरच्या वर्गातील लोकांना त्यांना सलाम करावा लागल्याने बंड-बेबंदशाही माजेल यामुळे त्यांना फलटणीत बंदी झाली. तेव्हापासून करंडी हाती घेऊन भीक मागण्याचा धंदा पत्करावा लागला आहे.
आज येथे आलेल्या सर्व तरुणांनी यापुढे आम्ही मेलेल्या गुरांना हात लावणार नाही व उष्टे खाणार नाही, अशी प्रतिज्ञा केली पाहिजे. बायांनी व तरुणांनी या गोष्टी अंमलात आणण्यासाठी प्राण गेला तरी हरकत नाही, अशी वृत्ती दाखविली पाहिजे. (टाळ्या.) वरिष्ठ वर्गाची याचना करण्याचा दीनवाणा कारभार यापुढे आपण बंद केला पाहिजे आणि यापुढे कायद्याने दिलेले हक्क आम्ही प्राण गेला तरी बजावण्यासाठी तयार असले पाहिजे. आज महारांची वीस लाख वस्ती आहे. यातील अधिकार गाजविण्यासाठी एक लाख माणसे मेली तरी काय बिघडले ? मलाम्हाताऱ्यांना सांगण्यापेक्षा तरुणांना सांगावयाचे आहे की तुम्ही आज न्याय्य हक्कांसाठी मरणाचे द्वारी जाण्यास तयार राहायला
पाहिजे.
आता शेवटची एक गोष्ट सांगावयाची आहे. या देशात नवीन राजकारण सुरू झाले आहे. या देशात इंग्रजांचे राज्य सुरू आहे ही भावना खरी नाही. १९३५ सालापर्यंत इंग्रजांची सत्ता होती. परंतु १९३५ सालच्या कायद्याने ती लोकांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. या सत्तेचा फायदा कोणाला होइल हे ज्याच्या त्याच्या राजकारणपटुत्वावर अवलंबून आहे. काही काळापूर्वी तुम्ही प्रसंगानिमित्त कलेक्टरकडे, मामलेदाराकडे अर्ज केल्यास ते त्याचा विचार करीत असत पण आज तसा अर्ज केल्यास ते सांगतील ' आज सत्ता आमचे हातात नाही, कायदेकौन्सिलच्या हातात आहे.' ही गोष्ट खरी आहे. कायदेमंडळाच्या कार्यावर बारकाईने लक्ष ठेवा. कोणता ठराव पास झाला, कोणता नापास झाला याची बारकाईने चौकशी करा. अस्पृश्य लोकांकरिता १५ जागा आहेत. हे लोक काय करतात याकडे लक्ष देऊन त्यांना. आणखी जास्त लोक कसे येऊन मिळतील व बहुमत कसे होईल इकडे लक्ष दिले पाहिजे. जास्त लोक मिळविण्यासाठी मी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आहे. तो आज जरी लहान असला, त्याची संख्या कमी असली तरी त्याची वाढ होण्यासाठी प्रयत्न करा. अत्यंत मोठी अशी एक प्रबळ संस्था आपल्या
+