न्याय्य हक्कांसाठी तरुणांनी . . . . पत्करले पाहिजे १५१
इलाख्यात आहे. ती काँग्रेस होय. काँग्रेस कितीही मोठी असली तरी ती गोरगरिबांचे कल्याण करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. कोणत्या वर्गापासून तुम्हाला हित होते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्यांनी आपली माणूसकी हिरावून घेतली ते शेठजी-भटजी होत आणि आज आपल्याला अन्न मिळत नाही ते याच वर्गामुळे आणि याच वर्गामुळे आपण या स्थितीला पोहोचलो आहोत.
सर्व ब्राह्मणेतर कुणबी वर्गास सांगावयाचे आहे की, तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊ नका. तुम्ही आम्ही त्रासले-गांजलेले लोक एक आहोत. तसेच एक होऊ या. काही लोक असे म्हणतात की, ' मी साम्राज्यशाहीविरुद्ध नाही. मला इंग्रज सरकारला घालवून देण्याची बिलकूल इच्छा नाही. पण ते बरोबर नाही. शेठजी-भटजी हे घरचे चोर आहेत. त्यांची लबाडी बंद केली पाहिजे. आपण आपल्या पायावर उभे राहिल्यास त्याला वेळ लागणार नाही. इंग्रज बोटीत बसून जाणार ! तेव्हा त्यांना घालविणे आवश्यक की खोत-सावकारांना ? या घरातील चोरांशी आपणाला लढा दिला पाहिजे. तुम्हाला इंग्रज सरकार नको असेल तर ते मलाही नको आहे.
ब्राह्मणेतर वर्ग आज जो काँग्रेसमध्ये सामील होत आहे त्या वर्गाच्या पुढाऱ्यांना माझे हे म्हणणे पटत नाही. त्यांना आज जरी नाही तरी येत्या पाच वर्षात ते पटून ते आमच्या पक्षात सामील होतील हे लक्षात ठेवा. (टाळया) खोती पद्धती ही एक गुलामगिरी आहे. याबाबतीत किती अन्याय होतात, किती दुःखे भोगावी लागतात हे तुम्हाला ठाऊक आहे. खोती नष्ट करण्याबाबत काँग्रेसने पुढाकार घेतला नाही. यावरून काँग्रेस कोणाची हे तुमच्या लक्षात येईल. कॉंग्रेसची बढती यापुढे होणार नाही. स्वतंत्र मजूर पक्ष हे झाड आज लहान असले तरी ते झपाट्याने वाढणार आहे. तुम्ही त्याच्या छायेला बसणार असून सर्व ब्राह्मणेतर श्रमजिवी जनताही बसणार आहे.
वरील आशयाचे डॉ. आंबेडकरांचे भाषण झाल्यावर परिषदेपुढे (१) मेलेली 'गुरे न ओढण्याबद्दल, (२) पाण व बेले हे महारातील भेद नष्ट करण्याबद्दल,
(३) खोती नष्ट करणे व महार वतन या बिलांना पाठिबा देणे, (४) हॉटेल किंवा उपहारगृह यात स्पृश्य हिंदुप्रमाणे व्यवस्था न झाल्यास त्यावर बहिष्कार घालण्याबाबत, (५) महार सेवासंघाच्या ठिकठिकाणी संघ व शाखा निर्माण
करण्याबाबत, (६) महारकीची कामे बंद पाडली गेली असतील ती दुसऱ्याने न
करणे, (७) दर गावाने ८ आणे वर्गणी भरून संघाचे पाठबळ वाढविणे वगैरे सात ठराव पास झाले.