बहुसंख्यांक असा शेतकरी व . . . . बनला पाहिजे १५३.
सभा ' जय आंबेडकर ' व ' खोतीशाही नष्ट हो ' ह्या जयघोषात बरोबर ५.३०
ला बरखास्त झाली.
नंतर त्याच दिवशी संध्याकाळी अरवली, (ता. संगमेश्वर) येथे सायंकाळी
७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आमदार घाटगे व आमदार चित्रे यांची
शेतकऱ्यांना आपला लढा असाच सनदशीरपणे लढावा व स्वतंत्र मजूर पक्षाचे
सभासद व्हावे वगैरे विषयांवर भाषणे होऊन सभा ८ वाजता आटोपली. नंतर
सर्व मंडळी डॉ. बाबासाहेबांसहीत चिपळूण येथे डाक बंगल्यात रात्री ९ वाजता
पोहचली. तेथे नाइस्कर बंधूंनी सर्व पाहूणे मंडळीला सुग्रास जेवण दिले. नंतर
१६ तारखेला सकाळी श्री. गडकरी वकील यांनी पाहुणे मंडळीला अल्पोहार दिला
ब सर्व मंडळी बाबासाहेबांसहीत स्वतंत्र मजूर पक्षाचे ऑफिस पहाण्यास
गेली. स्वतः बाबासाहेबांनी चिपळूण शाखेची ऑफिस तपासणी केली व सर्व | व्यवस्था नीट पाहून बाबासाहेब व पाहुणी मंडळी श्री. नाईस्कर यांच्या निवासस्थानी दुपारी जेवणास गेली. तेथे विश्रांती घेतल्यावर मंडळी १.३० ला
गुहागर पेठा येथे जाण्यास निघाली. गुहागर येथे २.३० ला डाक बंगल्यात सर्व मंडळी पोचली. श्री. आसगोलकर, पोलीस पाटील यांनी ओले नारळ व आंबे
यांचा पाहुणे मंडळीला अल्पाहार दिला. थोडी विश्रांती घेतल्यावर बाबासाहेब
व पाहुणे मंडळी सभेच्या ठिकाणी ३.३० ला आली. सभेत आमदार घाटगे, भाई कोवळे, भाई टिपणीस यांची भाषणे झाली व डॉ. बाबासाहेब यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना आपली गरीब परिस्थिती कशी सुधारावी व सर्व शेतकऱ्यांनी संघटीत होऊन ह्या जूलमी खोती पद्धतीला समूळ नष्ट करून टाकले पाहिजे, तरच शेतकऱ्यांची ही दीन अवस्था बदलेल असे सांगून काँग्रेसने जर खोती बिल पास केले नाही तर पुढील लढा कसा लढावा ह्याबद्दल थोडक्यात सूचना दिली. सभा ' आंबेडकर घोषात ' व ' खोती पद्धती नष्ट होवो ' ह्या घोषात बरखास्त झाली. नंतर बाबासाहेब वे पाहुणे मंडळी गुहागर पेठेतील श्री. खोत यांचे घरी अल्पोहारास्तव थांबली. थोडी विश्रांती घेतल्यावर मंडळी ६ वाजता गुहागरहून निघाली ती थेट चिपळूण येथे सभामंडपात ७.३० ला आली. प्रथमतः भाई कोवळे यांचे भाषण झाल्यावर आमदार घाटगे यांनी शेतकरी बंधुंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सध्या शेतकऱ्यांसाठी दौरा काढण्याचे महत्त्व समजावून दिले व शेतकऱ्यांनी याहीपेक्षा जास्त जमावाने सभेला हजर राहावे व स्वतंत्र मजूर पक्षाचे निशाणाखाली जमून खोती पद्धत नष्ट करण्यास डॉ. बाबासाहेबांस मदत करावी असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेतल्या नंतर सर्व मंडळी ८ वाजता चिपळूणहून निघाली, वाटेत परशराम देऊळ पाहाण्यास मंडळी गेली. देऊळ पाहून झाल्यावर देवळाचे ट्रस्टी यांचेयेथे डॉक्टरसाहेब व पाहुणे