१५-५-१९३८ बहुसंख्याक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे - Page 192

डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे १५४

मंडळी यास चहा, अल्पोहार देण्यात आला. नंतर ९.३० ला परशरामहून मुक्काम हलविण्यात आला तो थेट खेड येथे डाक बंगल्यात मंडळी येऊन पोहचली. श्री. जाधव यांनी पाहुणे मंडळीला चहा व अल्पोहार दिला. तेथे डॉक्टरसाहेब व पाहुणे यानी २ वाजेपर्यंत विश्रांती घेतली व सभेचे ठिकाणी (खेड) सभामंडपात दाखल झाली. प्रथमत: श्री. खांबे, तालुका सेक्रेटरी व आमदार घाटगे यांनी भाषणास सुरुवात केली व शेतकऱ्यांना आपला लढा सनदशीर मार्गाने लढावा व डॉ. बाबासाहेबांच्याच नेतृत्वाखाली विजय मिळवावा, अशा तर्‍हेने थोडक्यात भाषण केल्यावर बाबासाहेबांनी भाषणास सुरवात केली. सभेत ' आंबेडकर की जय ' ' खोतीशाही नष्ट हो ' वगैरे जयघोष होऊ लागले. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांना संघटित होण्यास व पक्षाची संख्या वाढवण्यास उपदेश केला व त्यांनी मांडलेले खोती बिल जर नापास झाले तर पुढे शेतकऱ्यांनी काय करावे याची त्यांना आगाऊ सूचना दिली व शेतकऱ्यांनी न्यायाने व सनदशीरपणाने वागून आपला सध्याचा लढा लढावा. कारण दुसऱ्या कोणत्याही मार्गानी शेतकरी वर्गाचा लढा यशस्वी होणार नाही. स्वतंत्र मजूर पक्षावर पूर्ण विश्वास असू द्यावा व हाच पक्ष तुम्हा शेतकरी वर्गाचे व गरीब जनतेचे हित करणार आहे. इतर कोणत्याही पक्षावर विश्वास ठेऊ नका. यानंतर श्री. चित्रे, टिपणीस, प्रधान यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांनी संघटित व्हावे व डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सध्याचा लढा लढावा अशी उपदेशपर भाषणे करून स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हावे असे सांगून आपली भाषणे संपविली. मंतर सभा संपून बाबासाहेब व पाहुणे मंडळी खेडहून दापोलीस जाण्यास निघाली. वाटेत फूरूस मुक्कामी (आमदार घाटगे यांचे घरी) सुभेदार घाटगे व गावपुढारी, स्काऊट व गावातील काही प्रमुख खोत डॉ. बाबासाहेबास सामोरा आली, पुढे ' आंबेडकर झिंदाबाद ' वगैरे जयघोषात फुरूस महारवाड्यात जेवण्यास आली. येथे श्री. सुभेदार घाटगे, पेन्शनर गणपत सोनु गमरे या वृद्ध पुढाऱ्यांनी पाहूण्यांची योग्य ती बडदास्त राखली व जेवण झाल्यावर डॉ. बाबासाहेब व पाहुणे फुरूस गावच्या आखाड्याचे मर्दानी खेळ पहाण्यास थांबले. नंतर डॉ. बाबासाहेब स्काऊट सहित रस्त्यापर्यंत चालत गेले व डॉ. बाबासाहेबांच्या ' जयजयकार ' व्‌ ' खोतीशाही नष्ट हो. अशा जयघोषानी फुरूस गावातील मुसलमान खोत फार हादरून गेले. कित्येक खोत बाबासाहेबांचे दर्शन दडून घेत होते. स्काऊटची व आखाड्याची व्यवस्था श्री. भी. गो. घाटगे व माधवराव फुरीसकर, गमरे यांनी उत्तम रीतीने राखिली होती. डॉ. बाबासाहेबांची दौऱ्यात प्रथमत: ओवाळणी मुक्काम फुरूस येथे सुहासीनी सुभेदारीण लक्ष्मीबाई घाटगे,