१५-५-१९३८ बहुसंख्याक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे - Page 193

बहुसंख्यांक असा शेतकरी व . . . . बनला पाहिजे १५५

सौ. गंगुबाई गमरे व सौ. मुक्ताबाई घाटगे यांनी केली व नंतर कु. मुक्ताबाई घाटगे

यांनी मंगल पद सुस्वर सुरात गाईले. ५.३० वाजता डॉ. बाबासाहेब व पाहुणे मंडळी फुरसाहून निघाली. जातेवेळी सुभेदार घाटगे व पेन्शनर गणपत गमरे यांनी सर्वास निरोप दिला. दापोलीला काळकाईचा कोड येथे डॉ. बाबासाहेबांची व पाहुणे मंडळीची उतरण्याची सोय करण्यात आली होती. तेथे चहा घेतल्यावर

अध्यक्ष व पाहुणे मंडळी सभेच्या ठिकाणी ८ वाजता पोहोचली.

दापोलीची जाहीर सभा

नंतर सभेस सुरवात झाली. प्रथमतः: सेक्रेटरी श्री. खांबे यांनी थोडक्यात डॉ. बाबासाहेबांच्या दौच्याबद्दल माहिती देऊन सभेस सुरवात केली. डॉ. बाबासाहेब हे स्वतः भाषण करण्यास उठले. पण मागील सभेच्या

| भाषणामुळे त्यांचा गळा एवढा बसला होता की, शेवटी त्यांस बोलता न आल्यामुळे

भाई चित्रे हेच आपल्याला मी जे काही सांगणार आहे तेच त्यांच्या तोंडून ऐकावे एवढे बोलून बाबासाहेब खुर्चीवर बसले. नंतर चित्रे ह्यांनी दौऱ्याची सविस्तर हकीगत सांगून डाँक्टरसाहेबांच्या प्रकृतीवर किती परिणाम झाला हे दर्शविले व | डॉ. बाबासाहेबांना जे काही शेतकऱ्याना सांगावयाचे होते ते त्यांनी उत्तम रीतीने | जमलेल्या समुदायाला पटवून दिले. शेतकऱ्यांना होत असलेला खोताचा जुलूम निदान खोती बिलाचा निकाल लागेपर्यंत तरी सोशीला पाहिजे. कारण आज काँग्रेस सरकार, अंमलदार, कोर्ट कचेरी सर्व खोतांच्या, शेठ सावकरांच्या बाजूला आहे. पण आपला हा लढा असाच नेटाने, एकीने लढत ठेवावा व त्यासाठी वेळप्रसंगी प्राणांची आहुतीही देण्याचा प्रसंग आला तरीही मागे हटले न पाहिजे. हेही करून भागणार नाही तेव्हा काँग्रेसप्रमाणे आपणही आपले हक्क शाबीत करण्यासाठी तुरुंगही भोगला पाहिजे. शेवटी पावसाळ्यानंतर ह्या खोती बिलाचा काय निकाल लागतो त्यावर पुढील लढा अवलंबून राहील. तरी सध्या निराश न होता एकी व सहनशीलता ठेऊन सध्याचा लढा लढावा. नंतर भाई टिपणीस, प्रधान, चिटणीस व कोवळे यांची जोरदार व उपदेशपर भाषणे झाली. शेवटी आमदार घाटगे ह्यांनी आपल्या जबाबदारीवर दौरा पार पाडण्याची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडली. सर्व स्थानिक पुढारी व कार्यकर्ते ह्यांनी ह्या कामी त्यांना मदत केली. त्याबद्दल स्वतंत्र मजूर पक्षातफ भाई चित्रे यांनी सर्वांचे आभार मानले व आमदार घाटगे यांनी डॉ. बाबासाहेब व पाहुणे मंडळी यांनी आपला अमूल्य वेळ खर्चून या भागात दौरा काढला ह्याबद्दल. आभार मानून अध्यक्षांना पुष्पहार घातला व॑ भगिनी समाजातफेही अध्यक्षांना

पुष्पहार घातला.