१२३३
जीवनात सर्वोच्च स्थानप्राप्तीची महत्त्वाकांक्षा जोपासा
तारीख १६ मे १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिपळूण मुक्कामी
अत्यंत स्फूर्तिदायक भाषण झाले. डॉ. साहेबांच्या भाषणापूर्वी श्रीमती रत्नाबाई
हिचे भाषण झाले. ती म्हणाली, “ आमच्यावर खोतांचा भयंकर जुलूम होत
असून, आता तो असह्य झाला आहे. तुम्ही आता येथे सभा घेऊन खेड,
दापोली येथे जाल व तेथून मुंबईस परत फिराल. आम्ही मात्र येथे कायमचेच राहाणार आहोत. तुम्ही गेल्यावर आमचा छळ कायम राहील. अशा
स्थितीत तुम्ही आमच्यासाठी काय करीत आहा ? तरीपण मला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगिरीविषयी आशा वाटते “ वगैरे.
या भाषणानंतर काँग्रेस पक्षियांकडून कुत्सित अर्थाने टाळ्या वाजविल्या गेल्या.
उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले,
खरोखर येथे तुम्हा शेतकऱ्यांजवळ राहून तुमची यथाशक्ती सेवा करण्यात मी धन्यताच मानली असती. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की तुमच्याप्रमाणेच मलाही माझा व्यवसाय आहे व तो व्यवसाय केल्याशिवाय माझा पोटापाण्याचा प्रश्न सुटत नाही. माझा व्यवसाय मोठ्या दर्जाचा असला तरी मी बांधलेला
आहे. माझा जन्म गरीब परिस्थितीत झाला. माझेवर वडिलांच्या ३-४ हजार रुपये कर्जाचा बोजा होता. सांगण्याचा हेतू की, मी गर्भश्रीमंत नाही. त्यामुळे माझ्या इच्छेविरुद्ध तुम्हाला सोडून माझ्या व्यवसायाकरिता मला मुंबईस जाणे भाग आहे. |
आताच रत्नाबाईच्या भाषणानंतर काही गृहस्थांनी टवाळी करण्याच्या उद्देशाने टाळ्या वाजविल्या. त्यांच्या टाळ्यांचा अर्थ मी असा समजतो की त्यांच्या दृष्टीने आपल्या पक्षाची परस्पर ' हजामत ' झाली. परंतु मी विचारतो की या लोकांना टाळ्या वाजविण्याचा काय हक्क आहे ? आम्ही जरी मुंबईस राहात असलो तरी हे बाराही महिने येथेच राहातात. त्यास काय तुमची दुःखे दिसत नाहीत ? त्यास तुमची दुःखे जरुर माहीत आहेत परंतु त्यास तुमच्याकरिता काहीही करावयाचे नाही. काही खोत कुळास म्हणतात की, ' तुझा आंबेडकर
जनता : २८ मे, १९३८.