१६-५-१९३८ जीवनात सर्वोच्च स्थानप्राप्तीची महत्त्वा- कांक्षा जोपासा - Page 197

जीवनात सर्वोच्च स्थानप्राप्तीची महत्त्वाकांक्षा जोपासा १५९

आज तुम्ही खोतांच्या जुलूमामुळे भीरू व भेकड बनला आहात. खोताने

नुसते तुमचेकडे पाहिल्यास तुमचे अंगाचा थरकाप होतो. परंतु आता ही भीती

सोडून त्याने ' अरे ' म्हटल्यास तुमची 'कारे' म्हणण्याची तयारी झाली पाहिजे

व त्याने काठीने मारल्यास तुमचीही काठी उचलण्याची तयारी पाहिजे. प्रत्येक

मनुष्यास स्वसंरक्षणाचा कायदेशीर अधिकार असतो. हे मी तुम्हास बॅरिस्टर या

नात्याने सांगतो. या सर्व गोष्टी तुम्हास स्वत:च करण्यास शिकले पाहिजे. कारण

प्रत्येकाचे मदतीस आम्हास पोलिसशिपाई देता येणार नाहीत. आज तुम्ही

सर्वानी जातीभेद, धर्ममेद विसरून खोतशाहीस नामशेष केले पाहिजे. सर्व

कुळांनी आपली एकच जात आहे, असे समजले पाहिजे. तसेच खोताने महार

कुळाकडून जमीन काढली तर ती कुळवाडी अगर मुसलमान कुळाने करू

नये. तसेच कुळवाड्याकडून काढल्यास महार अगर मुसलमान यांनी करू

नये. सुसलमान कुळाकडून काढल्यास महार अगर कुळवाडी यांनी करू

नये. आज खोत तुमच्यावर जुलूम करीत असले तरी ती त्यांची शेवटची धडपड

आहे, हे विसरू नका. मनुष्य मरताना हातापायाची जास्त धडपड करीत

असतो. स्वतंत्र मजूर पक्षाने तुमच्याकरिता खोती बील आणले आहे, हे तुम्हास

माहीत असेलच. परंतु आज कायदे मंडळात काँग्रेसचे बहुमत असल्यामुळे हे

' खोती बिल ' पास होईलच, अशी हमी देता येत नाही. परंतु हे बिल

पास झाले नाही तर माझ्याकडून हुकूम झाल्याबरोबर सर्व कुळांनी खोतास

' मक्ता ' देण्याचे बंद केले पाहिजे. तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही खोतास

` मक्ता ' न घातल्यास तुमचेवर तो ' मदतदावे ' करून जप्ती वारंट आणवून

तुमचेकडून धान्य वगैरे बेलिफाकरवी जप्त करून नेतो. परंतु रत्नागिरी

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी खोतास ' मक्ता ' घालण्याचे बंद केल्यास सरकार वठणीवर आल्याशिवाय राहणार नाही. कारण साधारणपणे प्रत्येक तालुक्यात

५०-६० हजार शेतकरी असतात. या हिशेबाने तितकेच ' मदतदावे ' खोतास करावे लागतील व प्रत्येक तालुक्यात दोन-तीनच बेलीफ असल्यामुळे इतक्या शेतकऱ्यांकडून ' वसूल ' करणे अशक्य होईल व अशा प्रकारे या खोतशाहीस धक्का बसल्याशिवाय राहाणार नाही. या कारणास्तव तुम्हावर तुरुंगात जाण्याची पाळी आल्यास तयारी पाहिजे. मी येथे जाहीर करतो की तुमचेकरिता तुरुंगात जाण्यास मी प्रथम तयार आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्यकर्ते हेही वेळ पडल्यास तुमचे हिताकरिता तुरुंगात जाण्यास एका पायावर तयार आहेत. परंतु तुमचीही आत्मबलिदान करण्याची तयारी असली पाहिजे तुरुंगात जाण्यात कोणताही कमीपणा नाही. कारण आजचे