१३४
खोती नष्ट करण्याचे
मी हाती कंकण बांधले आहे
॥ रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर
म | विश्रांतीसाठी ता. १८ मे १९३८ रोजी महाड येथे आले. ता. २० मे १९३८
| रोजी येथील प्रसिद्ध गाडीतळात रात्री ९ वाजता जाहीर सभा भरली
| होती. सुमारे दहा हजार शेतकरी मोठ्या उत्साहाने आले होते. सर्व विरोधी
| पक्षाचे लोकही मुद्दाम आले होते. अस्पृश्यांपेक्षा स्पृश्य शेतकऱ्यांचाच जमाव
| जास्त दिसत होता. शेठ, सावकार, जमीनदार वगैरे भांडवलदार लोक
भीतीयुक्त मनाने आजुबाजूला उभे राहून गंमत बघत होते. स्वयंसेवकांच्या
| रांगांमधून डॉ. बाबासाहेब बरोबर ९ वाजता सभास्थानी आले. प्रथम
| श्री. नानासाहेब टिपणीस यांनी स्वतंत्र मजूर पक्षाने कुलाबा जिल्हयात
| शेतकऱ्यांकरिता काय केले याचे विस्तृत वर्णन केले. मुर्शी चांढोरे वगैरे गावच्या
| खोताचा कुळावर होत असलेला जुलूम दूर करण्याचे श्रेय स्वतंत्र मजूर
|
पक्षालाच आहे वगैरे माहिती त्यांनी सांगितली. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर
टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उभे राहिले. मुंबई प्रांतातील काँग्रेसचे
|
राजकारण व खोती बिले या दोन विषयांवर सुमारे दीड तास डॉक्टरसाहेबांचे
|
जोरदार भाषण झाले.
|
ते म्हणाले,
निवडणुकीपूर्वी काँग्रेसने शेतकऱ्यांना पुष्कळशी गोड आश्वासने देऊन
| त्यांची मते निळविली. काँग्रेसने अधिकार रवीकार करून अकरा महिने होऊन
| गेले तरी अद्याप तिजकडून लोकहिताचे एकही काम झालेले | नाही. पदवीदान विरोध, लोकलबोर्ड वगैरे सारखी निष्फळ व निरुपयोगी बिले
$ पास करण्यात काँग्रेस मंत्रीमंडळाने कसातरी वेळ काढून लोकांना झुलविले
॥ आहे. नाही म्हणावयास शेतकऱ्यांच्या मोर्च्यामुळे घाबरून काँग्रेस सरकारने `
| शेतकऱ्यांची जमीन विकण्याला बंदी करणारे बील पास केले. त्यातसुद्धा
॥ म्हणण्यासारखा दम नव्हता. स्वतंत्र मजूर पक्षाने शेतकऱ्यांच्या हिताच्या
। मांडलेल्या अनेक उपसूचना सरकारने फेटाळून लावल्या. मोठ्या कष्टाने
॥ जनता : ४ जून १९३८.
एनडब्ल्यू-६९-११-अ