१३५
आपल्या पक्षाचे सभासद व्हा
आपल्या पक्षाचे बळ वाढवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जावळी तालुक्याला भेट द्यावी अशी जावळी
तालुक्यातील जनतेची फार दिवसांपासून इच्छा होती. शनिवार तारीख २१ मे
१९३८ रोजी सकाळी बाबासाहेब, सुभेदार सवादकरांना भेटण्याकरिता पांचगणी
मुक्कामी येणार आहेत असे गुरुवार तारीख १९ मे १९३८ रोजी सायंकाळी
समजताच एक दिवसाचे आत जावळी तालुका स्वतंत्र मजूर पक्ष परिषद अधिवेशन
| दुसरे मे. आमदार भाई चित्रे, बी. ए., एम. एल. ए. यांचे अध्यक्षतेखाली भरविण्याचे
' कार्यकर्त्यांनी जाहीर केले. शुक्रवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व
` कार्यकर्त्यांनी जाहीर पत्रके व प्रचारकार्य करण्याचे काम पांचगणीपासून आसपास
` सहा मैलातील खेडे गावात केले. शनिवारी सकाळी बरोबर साडे दहाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मे. आमदार भाई चित्रे, मे. रेवजी बुवा डोळस,
मे. नानासाहेब सुरबा टिपणीस, मे. कोवळे व सरदार यांचेसह पांचगणी स्वतंत्र :
मजूर पक्ष शाखेचे ऑफिसात येऊन उतरले. ऑफिसात शाखेचे चेअरमन
मे. डॉ. एस. एस. बंदिसोडे यांनी त्यांचे स्वागत केल्यावर थोड्या विश्रांतीनंतर
` तेथेच अल्पोपहार करण्यात आला. दुपारी १२ ला सर्व मंडळी डॉ. बिलिमोरियाच्या
हॉस्पिटलमध्ये सुभेदार सवादकरांना भेटण्यास गेली. प्रथमतः काही कुशल
प्रश्न वगैरे झाल्यानंतर बाबासाहेबांनी सुभेदार सवादकरांच्या प्रकृतीमानाची
चौकशी केली, प्रकृती साधारण सुधारत असल्याचे पाहून बाबासाहेबांना समाधान
वाटल्याचे दिसले. सुभेदारांना स्वतःच्या प्रकृतिपेक्षा इलाख्यात समाजकारण व
राजकारण कसे काय चालले आहे याचीच चिंता लागून राहिली आहे, असे
दिसले. त्यांनी एका मागून एक असे अनेक प्रश्न विचारण्यास सुरूवात केली
व बाबासाहेबांनी आणि भाई चित्रे, टिपणीस वगैरे मंडळींनी त्यांची शांतपणे उत्तरे
दिलीत. सुभेदार सवादकरांचे अंतःकरणात कसली तरी खळबळ उडून गेलेली
त्यांचे चर्चेवरून दिसून येत होती. मधून मधून त्यांचे नेत्रातून एकदोन
अश्रुबिंदूही चमकत होते. शेवटी बाबासाहेब म्हणाले, " सुभेदार, प्रकृती उत्तम
सुधारेपर्यंत अगदी हालचाल करू नका आणि डॉक्टर हुकूम देईपर्यंत हॉस्पिटलचे
RMR REE ERROR SPOS SPIES RR तत लक
जनता : ११ जून, १९३८.