२२-५-१९३८ दुहीमुळे कार्यभाग साधत नाही - Page 203

१३६
दुहीमुळे कार्यभाग साधत नाही

घोडे मुक्कामी आगाऊ जाहीर झाल्याप्रमाणे पुणे जिल्हा वतनदार महार परिषदेचे अधिवेशन दुसरे, रविवार ता. २२ मे १९३८ रोजी दुपारी ४ वाजता अखिल भारतीय अस्पृश्यांचे एकमेव पुढारी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली पार पंडले. श्रोतृसमुदाय बराच मोठा जमला होता. डॉ. बाबासाहेब १००० मैलांचा प्रवास करून आमदार रा. रा. भोळे, के. रा. मधाळे, वयोवृद्ध पुढारी रेवजी दगडूजी डोळस यांच्याबरोबर आले व परिषदेस मुंबईहून अस्पृश्य समाजाचे कल्याणासाठी अहर्निश झटणारे प्रमुख पुढारी रामभाऊ रावजी बोरीकर, मे. शंकर मोहनजी मिस्त्री, मे. गजोबा दुधावडे वगैरे मंडळी व पुण्याहून वि. बा. भालेराव, डी. सी. मिशन, गायकवाड मास्तर व वाल्हेकर मंडळी हजर होती. बरोबर ४.३० वाजता डॉ. बाबासाहेब स्थानापन्न होऊन सभेस रीतसर सुरूवात झाली. मातंग समाजातील ना. स.

व. शं. स. काळोखे यांनी सुस्वागतपर मे. डॉ. बाबासाहेबांचे नावे गायन

केले. नंतर स्वागताध्यक्ष केशव राणूजी शिशूपाळ, ग्राम पंचायत चेअरमन यांचे

स्वागतपर भाषण होऊन जमलेल्या लोकांचे आभार मानण्यात आले. नंतर

मे. सटबाजी लक्ष्मण, किसन महादेव काळोखे, मे. मारूती शेबाजी गायकवाड, 'विठ्ठल का. उपशाम, के. टी. भोसले, मे. मधाळे, मे. धोत्रे वगैरे मंडळींची

परिणामकारक व कळकळीची भाषणे झाली. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हे टाळ्यांच्या गजरात बोलण्यास उभे राहिले. त्यावेळी जयजयकारांच्या

घोषणा होत होत्या. डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

मी एक हजार मैलाचा प्रवास करून या परिषदेस हजर राहिलो. पुणे

जिल्हयाचे महार लोक हे सर्व जिल्ह्यांपेक्षा अगदी गबाळ आहेत. ते मृतमांस

व खरकटे खातात, असेमी ऐकतो ! यांच्यात कायमची दुही चालू आहे. दुहीच्या

योगाने यांचे कोणतेही काम नीट होत नाही. हे धर्मवेडे आहेत. माझा

देवाधर्मावर बिलकूल विश्वास नाही. देवाधर्माच्या खुळचट व वेडगळपणाविषयी

एकदा मी माझ्या ' हिंदू ' मित्रांना शंकराच्या पिंडीविषयी माहिती

विचारली. त्यांना ती सांगता आली नाही. शंकराची पिंडी काय आहे याचे

येथे जास्त स्पष्टीकरण करता येत नाही. ते निव्वळ संभोगदृश्य आहे. या

ठिकाणी धर्मश्रद्धाळू प्राण्यांनी वर्गणी गोळा करून एक दिवसाच्या यात्रेकरिता

धर्मशाळा बांधणे हे केवळ स्वार्थ साधण्याचे उग

णा

बांधणे हे केवळ स्वार्थ साधण्याचे उपाय आहेत. धर्मशाळेला १५०

जनता : ४ जून १९३८.