१६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
रुपये देऊ केलेत. तुम्ही दोनशे द्याल तर आम्ही तुम्हाला मते देऊ असे वाडे गटाचे म्हणणे होते. म्हणजे वाडे गटातील मंडळी किती नीच आहेत, हे लक्षात येते. जिल्हा बोर्डात एखाद्या दगडास उभा करून मानासाठी मोबदला मागणारा समाजाच्या नुकसानीस किती पात्र होतो याची तुम्हीच कल्पना करा. तेव्हा समाजाने अशांचा संबंध मुळीच ठेवू नये. जरी त्यांनी एखादा दगड मते देऊन निवडला तरी अखेर माझ्याशीच काम आहे. म्हणून स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मी जे उभे केलेले उमेदवार श्री. केशव राणूजी शिशुपाळ व महादेव बाळाजी कोकणे यांनाच मते देऊन निवडून आणा म्हणजे मी तुमचा आभारी होईन. आजचे काँग्रेस सरकार मुंबई कायदे मंडळात असलेल्या अल्पसंख्यांक गटाचा मुळीच विचार न करता बहुमताच्या जोरावर धुडगूस घालीत आहे व त्यापासून शेतकरी, कामकरी व गरीब मजूर वर्गाची हानी होणार आहे. महारवतन बिलाची माहिती दिल्यावर सदरहू बिलाला या परिषदेने अंतःकरणपूर्वक पाठिंबा दिला व सर्वानुमते ठराव पास झाला. पुणे जिल्ह्यात बोडिंगे उघडावी व सर्व पुणे जिल्ह्यातील मंडळीने ती उघडण्याचा प्रयत्न करावा असा ठराव पास केला व जीवदया संस्थेस पूर्ण पाठिंबा देण्यास मंडळीस सांगून भाषण संपविले.
नंतर जीवदया संस्थेचे ऑ. न. निजमुदीन साहेब यांनी जीवदया संस्थेला पाठिंबा दिल्याबद्दल डॉ. बाबासाहेबांचे अंतःकरणपूर्वक आभार मानिले. दरसाल चार आणे देऊन स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होण्याचे ठरले. शेवटी करंदीकर मास्तर यांनी आभार मानल्यावर सभेचा कार्यक्रम समाप्त झाला. डॉ. बाबासाहेबांना चहापार्टी व हारतुरे देऊन स्वागत केले. नंतर डॉ. बाबासाहेब व बरोबर आलेली मंडळी सुमारे ६ वाजता जमलेल्या मंडळीच्या जयघोषात पुण्यास गेली.
७ ७ ७