१७-६-१९३८ राजकारणातील आपली प्रगती ब्रह्मदेवही थांबवू शकणार नाही - Page 205

१३७
राजकारणातील आपली प्रगती
ब्रह्मदेवही थांबवू शकणार नाही

रोजी ता. १७ डॉ. आंबेडकर जून १९३८ कोर्टाच्या कामासाठी बाबासाहेब

प्रमुख मंडळी हजर होती. स्काऊट सकाळच्या गाडीने धुळे येथे आले. स्टेशनवर

सलामी दिली. दुपारी कोर्टात तुफान गर्दी लोटली पथकांनी बाबासाहेबांना

होती. अपील संपल्यानंतर वकील मंडळीच्या विनंतीला मान देऊन बाबासाहेबांनी बार _लायब्ररीला भेट दिली. तेथे काकासाहेब बर्वे तर्फे चहा-पान

झाले. संध्याकाळी बाबासाहेबांनी राजवाडे संशोधन मंदीराला भेट दिली. तेथे तात्यासाहेब भट वकील, भाऊराव कुळकर्णी वकील, काकासाहेब बर्वे वकील, रा. उपाध्ये, खरटमल, श्री. जाधव, बोराळे वगैरे मंडळी हजर होती. बराच

वादविवाद झाल्यानंतर पाठक शास्त्री हे जातीने हजर झाले. भट वकील व

शास्त्रीबुवा यांनी योग्य ती माहीती पुरविण्याचे अभिवचन दिल्यामुळे ते

अभिनंदनास पात्र आहेत.

रात्री सुमारे आठ वाजता म्यु. शाळा नं. ५ च्या आवारात सभा घेण्यात

आली. सभेला सुमारे ५-६ हजार मंडळींचा जमाव होता. प्राणयज्ञ दल

संस्थेची मंडळी pd आपल्या लाल पोषाखात हजर होती. स्त्री समूहही

भरपूर होता. , जाधव इत्यादी आल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट

झाला. बाबासाहेबांच्या नावाच्या जयजयकाराने सर्व सभास्थान दुमदुमून गेले

होते. श्री. यशवंतराव चिंतामण गायकवाड, सौ. कृष्णाबाई अहिरे, गोजाबाई

बागले, अहिल्याबाई देवराव, कु. सावित्रीबाई सावंत, सौ. आनंदीबाई जाधव यांची

स्फुर्तिदायक भाषणे झाली. त्यानंतर पश्चिम खानदेशचे भावी तरूण, उत्साही

पुढारी श्री. पुंडलिकराव तुकाराम बोराळे यांचे भाषण झाले. या मंडळींची भाषणे

झाल्यावर निरनिराळ्या संघातफे व महार सुशिक्षित स्त्री-पुरुषांकडून

डॉ. बाबासाहेबांस सुमारे ४० हारतुरे अर्पण करण्यात आल्यावर डॉ. बाबासाहेब

हे टाळ्यांच्या गजरात भाषण करण्यास उभे राहिले. ते म्हणाले,

प्रिय भगिनींनो आणि बंधुंनो, |

या भागात बरेच दिवसांपासून येणे झाले नाही. मला निरनिराळ्या

जिल्ह्यातील पत्रे आली आहेत. मध्यप्रांत, संयुक्त प्रांत, पंजाब वगैरे प्रांतातून

अनेक लोकांची पत्रे आलेली आहेत. किंबहुना हिंदुस्थानातून मला बोलाविण्याविषयी

पत्रे आलेली आहेत. सर्व हिंदुस्थानातून मला बोलाविण्याविषयी पत्रे येतात असे

जनता : २ आणि २३ जुलै १९३८.